husband Threatened to kill by acid ; incident of wakad | चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला ॲसिड टाकून जीवे मारण्याची धमकी
चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला ॲसिड टाकून जीवे मारण्याची धमकी

पिंपरी : पगाराच्या रकमेची मागणी करून विवाहितेचा छळ केला. चारित्र्यावर संशय घेऊन ॲसिड टाकून पतीने जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याचे सांगून ऑफिसमध्ये इ-मेल करून बदनामी केली. इंदूर, वाकड, चेन्नई व नोएडा येथे 24 जून 2012 ते 11 डिसेंबर 2019 दरम्यान हा प्रकार घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनार, याप्रकरणी 34 वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती, सासरे, सासू व पतीच्या मित्राविरोधत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी व आरोपी पती व सासू-सासरे इंदूर, चेन्नई व नोएडा येथे राहात होते. तसेच फिर्यादी महिला सध्या वाकड येथे रहात आहे. 

आरोपींनी फिर्यादी महिलेच्या चारित्र्यावर संशय घेतला. तिच्याकडे पगाराच्या रकमेची मागणी केली. त्यासाठी शारीरिक व मानसिक छळ केला. पतीने मारहाण व शिवीगाळ करून ॲसिड टाकून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच विवाहिता राहात असलेल्या वाकड येथील घरातून तिच्या पतीने व मित्राने तिच्या परवानगीविना घरातील सर्व साहित्य व दागिने असा पाच लाखांचा ऐवज चोरून नेला. तसेच तुझे फोटो एडिट करून त्याचा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल करून तुझ्या नातेवाईकांना पाठवीन, अशी धमकी पतीने दिली. तसेच ऑफिसमध्ये इ-मेल करून विवाहितेची बदनामी केली. वाकड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महेश स्वामी तपास करीत आहेत.

 

 

Web Title: husband Threatened to kill by acid ; incident of wakad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.