Pune News | किरकोळ वादातून पतीने केली पत्नीची गळा दाबून हत्या

By रोशन मोरे | Updated: December 3, 2022 18:27 IST2022-12-03T18:22:22+5:302022-12-03T18:27:10+5:30

राग अनावर झाल्याने केली पत्नीची हत्या....

Husband strangles his wife over a minor dispute pune latest crime news | Pune News | किरकोळ वादातून पतीने केली पत्नीची गळा दाबून हत्या

Pune News | किरकोळ वादातून पतीने केली पत्नीची गळा दाबून हत्या

पिंपरी : कौटुंबिक किरकोळ वादातून पतीने पत्नीची गळा दाबून हत्या केली. ही घटना शुक्रवारी (दि.१) रात्री पावने अकरा ते अकराच्या दरम्यान मोरयागिरी अपार्टमेंट, पिंपळे निलख येथे घडली. हत्या झालेल्या पत्नीचे नाव वृषाली आश्विन बडदे (वय ३४) असे होते. या प्रकरणी सूर्यकांत वामनराव मेमाने (वय ६०, रा. कदम वस्ती, हवेली) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी आश्विन वसंतराव बडदे (वय ४० रा. पिंपळे निलख) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहा वर्षापुर्वी आश्विन-वृषालीचा विवाह झाला होता. त्यांना दोन मुले आहेत. मात्र, लग्नाच्या काही कालावधीपासून छोट्या-छोट्या गोष्टीवरून त्यांच्यामध्ये भांडण होत होते. शुक्रवारी (दि.१) देखील त्यांच्यामध्ये असेच भांडण झाले. या भांडणाच्या रागातून आरोपी अश्विन याने वृषालीला मारहाण करत तिची गळा दाबून हत्या केली. या प्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक एस.बी, कदम हे करत आहेत.

Web Title: Husband strangles his wife over a minor dispute pune latest crime news