विवाहितेला मारहाण करत तिचा गर्भपात करणाऱ्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 16:27 IST2018-05-10T16:27:52+5:302018-05-10T16:27:52+5:30

सततच्या मारहाणीच्या प्रकारामुळे अखेर आॅगस्ट २०१७ मध्ये महिलेचा चार महिन्यांचा गर्भपात झाला. हा धक्का सहन न झाल्याने महिला मनोरुग्ण झाली आहे.

husband accussed in case of abortion | विवाहितेला मारहाण करत तिचा गर्भपात करणाऱ्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल

विवाहितेला मारहाण करत तिचा गर्भपात करणाऱ्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल

ठळक मुद्देगर्भपाताचा धक्का सहन न झाल्याने महिला मनोरुग्ण पहिली मुलगी झाल्याने आरोपीची सांभाळासाठी सासरच्या मंडळींकडे मुलीच्या पैसे द्या अशी मागणी

पिंपरी-चिंचवड (वाकड) : पहिली मुलगी झालेल्या पतीने दुसरीही मुलगीच होईल या शंकेने गर्भवती पत्नीच्या पोटात लाथा-बुक्यांनी मारहाण करत तिचा गर्भपात करून मानसिक शारीरिक छळ करणाऱ्या पती विरुद्ध गुन्हा वाकड ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे तर पीडित महिला पतीने केलेल्या अत्याचाराने मानसिक रुग्ण झाली आहे. तिच्यावर उपचार सुरू आहेत.  
प्रकाश केंगार (वय ३२, रा बोपोडी) या विकृत पती विरुद्ध विवाहितेचे वडील मोहन सिद्धराम जावीर (वय ५२, रा काळेवाडी) यांनी वाकड ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन वर्षांपूर्वी या दाम्पत्याचे लग्न झाले होते. त्यांना एक मुलगी देखील आहे. मात्र पहिलीच मुलगी झाल्याने आरोपीआरोपीची सांभाळासाठी  पत्नीचा छळ करत सासरच्या मंडळींकडे मुलीच्या पैसे द्या अशी मागणी करत होता. त्याच दरम्यान, पीडित महिला दुसऱ्यांदा गर्भवती राहिल्याने व यावेळेसही मुलगीच होईल या शंकेने तो गर्भपात होण्यासाठी पोटावर लाथा बुक्यांनी सातत्याने मारहाण करत महिलेचा छळ करीत होता. या सततच्या मारहाणीच्या प्रकारामुळे अखेर आॅगस्ट २०१७ मध्ये महिलेचा चार महिन्यांचा गर्भपात झाला. हा धक्का सहन न झाल्याने महिला मनोरुग्ण झाली आहे. अर्जाद्वारे विवाहितेच्या वडिलांनी पोलिसांकडे व्यथा मांडल्यावर याप्रकरणाची शहानिशा करत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: husband accussed in case of abortion