शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही तर रक्ताचे होतात, मग का असं केलं?; छगन भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार
2
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
3
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
5
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
6
हैदराबादमध्ये पावसाचं थैमान! SRH vs GT सामना रद्द झाल्यास संपुष्टात येईल RCB चं आव्हान?
7
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
8
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
9
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
10
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
11
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
12
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
13
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
14
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
15
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
16
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
17
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
18
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
19
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा
20
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल

पिंपरी-चिंंचवडमध्ये परगावी जाण्याच्या पाससाठी शेकडो नागरिकांनी गाठले तहसील कार्यालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2020 8:42 PM

परगावी जाण्यासाठी तहसीलदारांकडून पास प्रदान केले जातील अशी माहिती सोशल मीडियावर व्हायरल..

ठळक मुद्देगर्दी टाळण्यासाठी पोलीस बंदोबस्तासह लावला सूचना फलक

पिंपरी : परगावी जाण्यासाठी तहसीलदारांकडून पास प्रदान केले जातील, अशी माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने शेकडो नागरिकांनी पिंपरी-चिंचवड अप्पर तहसीलदार यांचे कार्यालय गाठले. मात्र पास देण्याबाबत शासनाकडून लेखी आदेश नसल्याचे तहसीलदार कार्यालयाकडून सांगण्यात आले. त्यामुळे नागरिकांचा हिरमोड झाला. प्रशासकीय यंत्रणेत समन्वयाचा अभाव असल्याचे या वेळी दिसून आले. त्यामुळे नागरिकांचा गोंधळ झाला. तहसीलदार कार्यालयासमोर गर्दी टाळण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. लॉकडाऊन वाढविण्यात आल्याने पिंपरी-चिंचवड शहरात अडकलेल्या नागरिकांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत एमआयडीसी व हिंजवडी-माण आयटी पार्क परिसरात लाखो नागरिक अडकले आहेत. यात परप्रांतियांसह राज्याच्या कानाकोपºयातील मजूर व कामगारांचाही समावेश आहे. देशभरात विविध ठिकाणी अडकून पडलेल्या अशा नागरिकांना त्यांच्या इच्छित स्थळी जाण्यासाठी प्रशासनाकडून पास उपलब्ध करून देण्यात येत आहेत. मात्र यात सुसूत्रता नाही. पोलीस, महसूल तसेच इतर यंत्रणांमध्ये समन्वय होऊ न शकल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. केंद्र शासनाने लॉकडाऊन वाढविल्यानंतर परगावी जाणाºया नागरिकांसाठी नियमावली जाहीर केली. अर्ज भरून दिल्यानंतर तहसीलदार यांच्याकडून संबंधित नागरिकांना पास देण्यात येतील, असे सूचित करण्यात आल्याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यामुळे याबाबत माहिती जाणून घेण्यासाठी नागरिकांनी शनिवारी (दि. २) सकाळी नऊपासून पिंपरी-चिंचवड अप्पर तहसीलदार यांच्या आकुर्डी येथील कार्यालयासमोर येण्यास सुरूवात केली. परिणामी येथे नागरिकांचा वावर वाढून जमाव होऊन गर्दी होऊ लागली. नागरिकांची वाढती संख्या लक्षात घेऊन पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. परगावी व परजिल्ह्यातील व्यक्तींना जाण्यासाठी पास देण्याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा लेखी आदेश नाही. त्यामुळे नागरिकांची तहसीलदार कार्यालयाच्या प्रवेशव्दारासमोर गर्दी करू नये, अशा आशयाचा फलक तहसीलदार कार्यालयाच्या प्रवेशव्दारावर लावण्यात आला. तसेच पोलीस बंदोबस्त देखील येथे तैनात करण्यात आला होता.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcollectorजिल्हाधिकारीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिस