house break incident at charoli rsg | बंद दरवाजाचे कुलूप तोडून दागिने लंपास ; चऱ्हाेली येथील घटना

बंद दरवाजाचे कुलूप तोडून दागिने लंपास ; चऱ्हाेली येथील घटना

पिंपरी : बंद दरवाजाचा कडीकोयंडा उचकटून व कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. ६५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने घरातून चोरून नेले. ताजणेमळा, चऱ्होली येथे सोमवारी (दि. २४) भरदिवसा दुपारी साडेचार ते सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान हा प्रकार घडला. 

दीपाली युवराज जोशी (वय ३०, रा. ताजणेमळा, चऱ्होली) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दीपाली जोशी यांचे घर सोमवारी दुपारी साडेचार ते सायंकाळी साडेसहा दरम्यान बंद होते. त्यावेळी अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या बंद दरवाजाचे कुलूप व कडीकोयंडा तोडला. त्यानंतर घरात प्रवेश करून चोरट्यांनी ६५ हजारांचे सोन्याचे दागिने घरातून चोरून नेले. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: house break incident at charoli rsg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.