दिघी पोलिस ठाण्यासमोरच केली पत्नीसह तिच्या चुलतीला मारहाण, गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2024 10:38 IST2024-05-15T10:38:21+5:302024-05-15T10:38:34+5:30

दिघी पोलिस ठाण्यासमोर शनिवारी (दि. ११) दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली...

His wife and her cousin were beaten in front of Dighi Police Station | दिघी पोलिस ठाण्यासमोरच केली पत्नीसह तिच्या चुलतीला मारहाण, गुन्हा दाखल

दिघी पोलिस ठाण्यासमोरच केली पत्नीसह तिच्या चुलतीला मारहाण, गुन्हा दाखल

पिंपरी : पत्नीसह तिच्या चुलतीला मारहाण केली. याप्रकरणी पतीला अटक केली. दिघी पोलिस ठाण्यासमोर शनिवारी (दि. ११) दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली.

जनार्दन भास्कर भुंबे (३०, रा. स्वारगेट) यांनी याप्रकरणी रविवारी (दि. १२) दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून पोलिसांनी ऋषिकेश छगन घोडके (वय ३०) व त्याची आई यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जनार्दन यांची बहीण व त्यांचे चुलती है पोलिस ठाण्यामधून घरी जात असताना ऋषिकेश व त्याच्या आईने त्यांना अडविले आणि शिवीगाळ करत हाताने तसेच गाडीच्या चावीने मारहाण करून जखमी केले.

Web Title: His wife and her cousin were beaten in front of Dighi Police Station