हिंजवडीत ४० हजाराचा गुटख्याचा बेकायदा साठा पकडला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2019 16:04 IST2019-03-04T16:03:06+5:302019-03-04T16:04:07+5:30
हिंजवडीत ४० हजार ४०० रूपयाचा तंबाखूजन्य पदार्थाचा बेकायदा साठा जप्त करण्यात आला. तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस आणि साठा करण्यास बंदी असताना, गुटख्याचा साठा केल्याप्रकरणी तिघांविरूद्ध रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिंजवडीत ४० हजाराचा गुटख्याचा बेकायदा साठा पकडला
पिंपरी : हिंजवडीत ४० हजार ४०० रूपयाचा तंबाखूजन्य पदार्थाचा बेकायदा साठा जप्त करण्यात आला. तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस आणि साठा करण्यास बंदी असताना, गुटख्याचा साठा केल्याप्रकरणी तिघांविरूद्ध रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष श्रीमंत घोळवे यांनी आरोपींविरोधात वाकड पोलिसांकडे गुन्हा दाखल केला आहे. दिनेश हरिश मुलचंदानी व त्यांचे भागीदार, व्यवस्थापक नागेश रामकृष्ण विश्वकर्मा, आकाश विजय सोभानी अशी आरोपींची नावे आहेत. वाकड पोलिसांनी पाषाण सूस रस्ता येथे ही कारवाई केली. वाकड पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
(सविस्तर माहिती थोड्याच वेळात)