शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad Rain: २४ तासांमध्ये पिंपरी चिंचवड मध्ये सर्वाधिक पाऊस; १२७. ५ मिमी पावसाची नोंद

By विश्वास मोरे | Updated: September 25, 2024 19:13 IST

सायंकाळी साडेचार ते सहाच्या दरम्यान पावसाचा जोर वाढल्याचे अनेक भागांमध्ये पाणी साचले

पिंपरी : गणेशोत्सव काळात उघडीप दिलेल्या पावसाचे जोरदार आगमन झाले आहे. गेल्या २४ तासांमध्ये पुणे आणि पिंपरी- चिंचवड परिसरामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. सर्वाधिक १२७. ५ मिमी पावसाची नोंद चिंचवडमध्ये झाली आहे. तर सर्वाधिक कमी दापोडीत ८. ५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. 

गणेशोत्सव काळात पिंपरी चिंचवड आणि मावळ परिसरात पावसाने उघडीप दिली होती. त्यानंतर गेल्या पाच-सहा दिवसापासून उकाडा वाढला होता. दिवसा  ऊन, रात्री उकाडा आणि पहाटे गारवा असा संमिश्र वातावरणाचा अनुभव येत होता. सप्टेंबरमध्येच ऑक्टोबर हिट जाणवू लागली होती. मात्र, शनिवारपासून पावसाचे आगमन झाले आहे. सुरुवातीला हलक्या सरी येत होत्या. रविवारी आणि सोमवारी जोर कमी होता. मंगळवारी पावसाचा जोर वाढला. आज बुधवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. मात्र सकाळच्या टप्प्यात पावसाने उघडीप दिली. कडक ऊन पडले होते. दुपारी दीडपासून शहराच्या विविध भागांमध्ये पाऊस पडायला सुरुवात झाली. सायंकाळी साडेचारनंतर पावसाचा वेग वाढला. अचानक आलेल्या पावसाने कामावर गेलेल्या आणि कामावरून परतणाऱ्या कष्टकरी कामगार वर्गाची गैरसोय झाली. तारांबळ उडाली. 

सखल भागात साचले पाणी!

चिंचवड आणि पिंपरी परिसरात पावसाचा जोर अधिक होता. सायंकाळी साडेचार ते सहाच्या दरम्यान पावसाचा जोर अधिक होता. त्यामुळे सखल भागामध्ये पाणी साचले होते. तसेच पावसाळी गटारे काही ठिकाणी तुंबल्याने रस्त्यावर पाणी आले होते. त्यातून मार्ग काढताना वाहन चालकांना कसरत करावी लागत होती. सायंकाळी साडेपाचपर्यंत १२७. ५ मिमी पावसाची नोंद चिंचवड येथे झाली.  

असा झाला पाऊस!

 चिंचवड : १२७ मिमी शिवाजीनगर :१२४ मिमीखेड : ४१  मिमी लोणावळा : २६ मिमी राजगुरूनगर : २२ मिमी हवेली : १२. ५ मिमी लोहगाव : ३० मिमीमगरपट्टा:  १० मिमी पाषाण : १९.८ मिमीदापोडी : ८. ५ मिमी

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसWaterपाणीNatureनिसर्गDamधरणSocialसामाजिक