तेलगळतीमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेसवरील वाहतूक मंदावली

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2018 09:56 AM2018-11-13T09:56:58+5:302018-11-13T10:28:07+5:30

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अमृतांजन पुलाजवळील उतारावर टँकरमधून तेलगळती झाल्यानं परिसरात वाहतुकीची कोंडी निर्माण झाली आहे.

heavy traffic on Mumbai-Pune Express due oil leakage | तेलगळतीमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेसवरील वाहतूक मंदावली

तेलगळतीमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेसवरील वाहतूक मंदावली

Next

लोणावळा : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अमृतांजन पुलाजवळील उतारावर टँकरमधून तेलगळती झाल्यानं परिसरात वाहतुकीची कोंडी निर्माण झाली आहे. दिवाळीच्या सुट्यांमुळे गेले चार दिवस सतत वाहतूक कोंडीने गजबजलेल्या द्रुतगती महामार्गावर आजही सकाळी वाहतूक कोंडी झाल्याचे वाहन चालकांनी संताप व्यक्त केला. 

पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका टँकरमधून खंडाळा घाटातील उतारावर तेलगळती झाल्यानं हा मार्ग निसरडा झाला होता. खबरदारीचा उपाय म्हणून आयआरबी व महामार्ग पोलिसांकडून रस्त्यावर सांडलेल्या तेलावर माती टाकण्याचे काम करण्यासाठी मुंबईकडे जाणारी वाहतूक रोखून धरण्यात आली. खंडाळा गावापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. काही वेळानंतर संथगतीने ही वाहतूक सुरु करण्यात आली.

Web Title: heavy traffic on Mumbai-Pune Express due oil leakage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.