शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी-चिंचवडसह मावळ, मुळशी अन् खेडमध्ये धुवांधार पाऊस; नद्यांच्या पाणी पातळीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 21:29 IST

पवना, मुळा आणि इंद्रायणी ओसंडून वाहत असून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज...

पिंपरी : औद्योगिकनगरी पिंपरी-चिंचवडसह मावळ, मुळशी आणि खेड परिसरात मुसळधार पाऊस पडत असून सलग दुसऱ्या दिवशीही मुसळधार पावसाने नागरिकांना झोडपून काढले आहे. पवना, मुळा आणि इंद्रायणी ओसंडून वाहत आहेत. पवना धरणातून विसर्ग केला नसतानाही नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.महापालिकेची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज आहे. क्षेत्रीय स्तरावर गस्ती पथक तैनात ठेवले आहेत.गेल्या दोन दिवसांपासून शहर परिसरात संततधार सुरू आहे. रविवारपासून पावसाला सुरूवात झाली. मात्र, गुरूवार आणि शुक्रवार या दोन दिवसात संततधार सुरू आहे. तसेच मुळशी आणि खेड, मावळातही सलग पाऊस सुरू आहे. त्यामुळे शहरातील नदया ओसंडून वाहत आहेत...............पाणी पातळी वाढतेयपावसाचा जोर वाढल्याने पवना नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. पवना धरणातून विसर्ग केला नसतानाही यंदा पहिल्यांद्याच पावसाच्या पाण्यामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. सकाळपासून जोरदार पाऊस पडत आहे. दुपारनंतर पावसाने थोडी विश्रांती घेतली. त्यामुळे पाण्याचा निचरा झाला. चिंचवड येथील श्री मोरया गोसावी मंदीरात गुरूवारी पाणी शिरले होते. मंदिराचा अर्धा भाग पाण्यात बुडाला होता.  आज पाणी काहीसे कमी होते.............महापालिकेच्या वतीने पाहणीशहरातील रावेत, किवळे, चिंचवड, पिंपरी, पिंपळेनिलखसह नदीकाठच्या भागाची पाहणी प्रशासनाने केली. पवना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु केले नाही. पवना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु झाल्यास महापालिकेने नदी काठच्या नागरिकांच्या स्थलांतरणाची महापालिकेने सोय केली आहे. पिंपरी, फुलेनगरमधील नागरिकांनी स्थलांतरिक करण्याची मागणी केली होती. परंतु, नाल्याचे पाणी वाढले नसल्याने त्यांना स्थलांतरित केले नाही, असे आपत्ती व्यवस्थापन विभागाने सांगितले...........................................पिंपरी-चिंचवड शहरात दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाला. त्यामुळे पाणी कोठेही साचून राहिले नाही. नदीकाठच्या नागरिकांना स्थलांतरित करण्याची आत्तापर्यंत वेळ आली नाही. परंतु, पवना नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यास आणि नदीकाठच्या नागरिकांना स्थलांतरित करण्याची वेळ आल्यास महापालिकेने तयारी केली आहे.-विकास ढाकणे , अतिरिक्त आयुक्त.............................बोटी, जॅकेट सज्जमहापालिकेच्या आपत्ती निवारण कक्षाच्या वतीने सज्जता केली आहे. शाळांची साफसफाई करुन ठेवली आहे. वीज गेल्यास जनरेटरचीही व्यवस्था केली आहे. पवना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु झाल्यास नदीकाठच्या नागरिकांना उद्या, परवा स्थलांतरित करण्याची वेळ येवू शकेल. महापालिकेचा पूर नियंत्रण कक्ष कार्यान्वित आहे. बोटी, जॅकेट सज्ज ठेवल्या आहेत. आम्ही लक्ष ठेवून आहोत, असेही ढाकणे यांनी सांगितले.......................पवना धरण परिसरात दिवसभर पाऊस पडत आहे. सकाळपासून आत्तापर्यंत ३९ मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे दोन टक्क्यांनी पाणी साठ्यात वाढ झाली आहे. धरणातील पाणीसाठा ६८  टक्क्यांवर पोहोचला आहे.-अन्वर तांबोळी ,  स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, पवना धरण

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडRainपाऊसfloodपूरriverनदी