शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

मावळ व कामशेत परिसराला वादळी वाऱ्याने झोडपले; शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, वीज पुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 17:00 IST

विविध भागात अनेक झाडे व विजेचे खांब पडले, वीज पुरवठा बुधवारपासून खंडित

ठळक मुद्देशेतकऱ्याच्या काही घरांचे व चाळीचे पत्रे वादळी वाऱ्याने उडाल्याने १२ जण जखमी

मावळ / कामशेत : अरबी समुद्रात आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे संपूर्ण मावळ तालुक्यात जोरदार वारे आणि मुसळधार पावसाने बुधवारी दिवसभर थैमान मांडले होते. सोसाट्याचे वारे व पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, घराचे पत्रे उडाले, विजेचे खांब पडले, काही ठिकाणी घराच्या भिंती कोसळल्या, रस्त्यावर विजेच्या तारा पडल्या, महामार्ग द्रुतगती मार्ग येथे जाहिरात होर्डिंग कोसळले आदी घटना घडल्या आहेत. मावळात वीजपुरवठा खंडित झाल्याने संपूर्ण मावळ बुधवार पासून अंधारात बुडाले आहे.

निसर्ग चक्रीवादळाने मावळात बुधवारी सकाळ पासून पावसाची सुरुवात झाली. बहुतेक ठिकाणी पाऊस कमी पण सोसाट्याचे वारे वाहत होते. त्यामुळे अनेकांचे नुकसान झाले. बुधवारी सायंकाळ नंतर पावसाचा व वाऱ्याचा जोरही वाढला होता. मावळात सर्वत्र निसर्ग चक्रीवादळाने हाहाकार सुरू होता. बुधवारी दुपार नंतर ठिकठिकाणी बाजारपेठा ओस पडल्या होत्या. संपूर्ण मावळ तालुक्यावर या वादळाचा प्रभाव पडल्यामुळे अनेक ठिकाणी जुने वृक्ष उन्मळून पडले. तर विजेच्या तारा तुटल्याने वीजपुरवठा दिवसभर खंडित झाला आहे. त्यामुळे अनेक भागातील पाणीपुरवठा योजना बंद पडल्या आहेत. 

अरबी समुद्रावर निसर्ग चक्रीवादळाचा जोर वाढल्यानंतर मावळातील प्रमुख शहरात स्थानिक प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून वादळ, वारा, वीज तसेच रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांपासून सावधानतेचा इशारा देण्यात येत होता. या वादळाचा ग्रामीण भागात ही मोठा फटका बसला असून शेती व घरांचे नुकसान झाले आहे.

............................

सांगवडेत शेतकऱ्याच्या काही घरांचे व चाळीचे पत्रे वादळी वाऱ्याने उडाल्याने १२ जण जखमी

गहुंजे : सांगवडे , दारूंब्रे रस्ता भागात शेतकऱ्याच्या काही घरांचे व चाळीचे पत्रे वादळी वाऱ्याने उडाल्याने १२ जण जखमी झाले आहेत. दारूंब्रे कारखाना रस्ता येथे एका शेतकऱ्याच्या शेतातील गेल्या महिन्यात बांधलेल्या शेततळ्याचे सुमारे ४ लाखांचे नुकसान झाले आहे. विविध भागात अनेक झाडे व खांब पडले असून बुधवारी खंडित झालेला वीज पुरवठा सुरळीत झालेला नाही. 

 निसर्ग वादळामुळे पवना मावळातील सांगवडेतील ज्ञानेश्वर दिमाख राक्षे यांचे शेतातील घरासह चाळीचे पत्रे उडून गेले असून त्याठिकाणी राहणारे  १२ जण जखमी झाले आहेत. सोमाटणे फाटा येथील एका खासगी रुग्णालयात तिघांवर उपचार सुरु असून इतरांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.       सुरेखा सचिन घोटकुले (वय ४०) ही महिला तसेच साक्षी ज्ञानेश्वर राक्षे (वय १२ ) गौरी रणजित खंडागळे(वय १२)  या दोन मुली जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत . ज्ञानेश्वर राक्षे यांच्यासह ९ जणांना उपचारानंतर रात्री उशिरा घरी सोडण्यात आले आहे.वादळी वाऱ्याने घराचे व चाळीचे सर्व पत्रे उडाले असून चाळीत व घरात राहणाऱ्यांचे मोठे नुकसान झाले असल्याचे सांगण्यात आले आहे .

                

टॅग्स :mavalमावळmahavitaranमहावितरणFarmerशेतकरीCyclone Nisargaनिसर्ग चक्रीवादळHomeघरkamshetकामशेत