भोसरी पोलीस ठाण्यासमोरच महिलेशी अश्लील बोलून केला विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 16:12 IST2021-07-07T16:11:53+5:302021-07-07T16:12:32+5:30

आरोपीवर गुन्हा दाखल झाला असून त्याला अद्याप अटक झालेली नाही.

He raped a woman in front of Bhosari police station | भोसरी पोलीस ठाण्यासमोरच महिलेशी अश्लील बोलून केला विनयभंग

भोसरी पोलीस ठाण्यासमोरच महिलेशी अश्लील बोलून केला विनयभंग

पिंपरी: कामानिमित्त भोसरी पोलीस ठाण्यात आलेल्या एका महिलेचा विनयभंग केल्याची घटना मंगळवारी रात्री भोसरी पोलीस ठाण्यासमोर घडली आहे. या प्रकरणी महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रवींद्र शिवाजी पोमण (वय ५७, रा. रहाटणी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. परंतु त्याला अद्याप अटक झालेली नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री साडे आठ वाजताच्या सुमारास महिला आपल्या कंपनीच्या कामानिमित्त भोसरी पोलीस ठाण्यात आल्या होत्या. त्यांनी त्यांची कार पोलीस ठाण्याच्या बाहेर व्हिजीटर पार्किंगमध्ये पार्क केली. तेथून त्या पोलीस ठाण्यात येत होत्या.

त्यावेळी त्यांच्या ओळखीचा रवींद्र हा पोलीस ठाण्यासमोर भेटला. त्याने महिलेला पाहून 'मॅडम तुम्ही रात्री इकडे कसे काय?' अशी विचारणा केली. त्यावेळी महिलेने कंपनीच्या कामासंदर्भात पोलीस स्टेशनला आल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने अश्लील बोलून महिलेच्या चारित्र्या विषयी अपशब्द वापरून त्यांचा विनयभंग केला.

Web Title: He raped a woman in front of Bhosari police station