दुचाकीसाठी विवाहितेचा छळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2019 16:48 IST2019-05-12T16:47:03+5:302019-05-12T16:48:27+5:30

दुचाकी आणि पोल्ट्रीफार्मसाठी जागा खरेदी करण्याकरिता माहेराहून पैसे आणावेत, या मागणीसाठी विवाहितेचा छळ करणाऱ्या पतीवर हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

harresment for two wheeler | दुचाकीसाठी विवाहितेचा छळ

दुचाकीसाठी विवाहितेचा छळ

पिंपरी :  दुचाकी आणि पोल्ट्रीफार्मसाठी जागा खरेदी करण्याकरिता माहेराहून पैसे आणावेत, या मागणीसाठी विवाहितेचा छळ करणाऱ्या पतीवर हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २७ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. 

हिंजवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमित सुरिंदर कौल (वय २८, रा. रिव्हर व्ह्यू सोसायटी, बालेवाडी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सुमितचे मार्च २०१८ मध्ये लग्न झाले. लग्न झाल्यापासून सुमितने पत्नीला दुचाकी व पोल्ट्री फार्मकरिता जागा खरेदी करण्यासाठी माहेराहून पैसे आणण्याची मागणी करत शारिरीक व मानसिक छळ सुरू केला. पत्नीच्या नावावरील हुंडाई आयटेन ही मोटार स्वत:च्या नावावर करून घेतली.

Web Title: harresment for two wheeler