एवढंच बाकी राहिले; आता स्कुल बसच्या बॅटऱ्या चोरणेही नाही सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2021 10:46 IST2021-08-05T10:46:01+5:302021-08-05T10:46:09+5:30

पिंपरीच्या प्राधिकरण निगडी येथील प्रकार

The hard work done to steal the school bus battery disappeared | एवढंच बाकी राहिले; आता स्कुल बसच्या बॅटऱ्या चोरणेही नाही सोडले

एवढंच बाकी राहिले; आता स्कुल बसच्या बॅटऱ्या चोरणेही नाही सोडले

पिंपरी : अज्ञात चोरट्यांनी स्कूल बसच्या ४६ हजार रुपये किंमतीच्या चार बॅटऱ्या चोरून नेल्या. प्राधिकरण निगडी येथे १५ जुलै ते ३ ऑगस्ट दरम्यान चोरीचा हा प्रकार घडला. शशिकांत भानुदास कदम (वय ४४, रा. प्राधिकरण निगडी) यांनी या प्रकरणी बुधवारी (दि. ४) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कदम यांच्या ताब्यातील स्कूल बस प्राधिकरण निगडी येथील मोकळ्या जागेत लॉक करून पार्क केली होती. दरम्यान चोरट्यांनी गाडीचे वायरिंग कट करून ४६ हजार रुपये किंमतीच्या चार बॅटऱ्या चोरून नेल्या. सहायक पोलीस निरीक्षक स्वाती खेडकर तपास करीत आहेत.

Web Title: The hard work done to steal the school bus battery disappeared