Pimpri Chinchwad | पोलिसाची गचांडी पकडत म्हणाला, "तुझी वर्दी उतरवतो..." रिक्षाचालकाचा मुजोरीपणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2023 21:25 IST2023-04-05T21:24:36+5:302023-04-05T21:25:01+5:30
या प्रकरणी पोलिस हवालदार नामदेव दासप्पा दांडेकर यांनी शिरगाव परंदवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली...

Pimpri Chinchwad | पोलिसाची गचांडी पकडत म्हणाला, "तुझी वर्दी उतरवतो..." रिक्षाचालकाचा मुजोरीपणा
पिंपरी : विरुद्ध दिशेने येत रिक्षाचालकाने दुचाकीचालकाला धडक दिली. त्यावेळी दुचाकीचालक आणि रिक्षाचालक यांच्यामध्ये वाद सुरू होता. त्यावेळी पेट्रोलिंग करणारे पोलिस कर्मचारी तेथे गेले असता रिक्षाचालकाने पोलिस शिपायाची गचांडी पकडून मी कोणाला घाबरत नाही, तुझी उतरतो, अशी धमकी दिली. तसेच स्वत:चे डोके रिक्षावर आपटून घेतले. ही घटना सोमवारी (दि.३) शिरगाव, परंदवाडी हद्दीतील चांदखेड येथे घडली. या प्रकरणी पोलिस हवालदार नामदेव दासप्पा दांडेकर यांनी शिरगाव परंदवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी विनोद गायकवाड (वय ३८, रा. बेबडओहळ, मावळ) याला अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे बीटमार्शलसोबत पेट्रोलिंग करत होते तेव्हा त्यांना दुचाकी आणि रिक्षाचा अपघात झाल्याचे दिसले. त्यांनी तेथे जाऊन अधिक चौकशी केली असता रिक्षाचालक विरुद्ध दिशेने जात असल्याचे समजले. त्यामुळे फिर्यादी यांनी रिक्षाचालकाला गाडी पोलिस स्टेशनला घे असे म्हटले. त्यामुळे आरोपी रिक्षाचालकाने फिर्यादी यांना शिवीगाळ करत त्यांची गचांडी पकडत त्यांना धमकी दिली.