Pune | हिंडवडीत रुम मालकाकडून तरुणीचा विनयभंग; गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2023 14:48 IST2023-01-03T14:48:01+5:302023-01-03T14:48:30+5:30

रुम मालकाविरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल...

Girl molested by room owner in Hindwadi; Filed a case | Pune | हिंडवडीत रुम मालकाकडून तरुणीचा विनयभंग; गुन्हा दाखल

Pune | हिंडवडीत रुम मालकाकडून तरुणीचा विनयभंग; गुन्हा दाखल

पिंपरी : पीजी मालक आणि त्याच्या भावाने रूममध्ये घूसून तरुणीशी गैरवर्तन करून विनयभंग केला. त्यासोबतच याचा जाब विचारणाऱ्या तरुणीच्या मित्रालादेखील मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. ३१) घडली. याप्रकरणी तरुणीने हिंजवडी पोलिस ठाण्यात रविवारी (दि.१) फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी श्रीनिवास रेड्डी, व्यंकटेश रेड्डी (दोघे रा. हिंजवडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राहत असलेल्या रूममध्ये तिच्या परवानगीशिवाय पीजीमालक श्रीनिवास रेड्डी आणि त्याचा भाऊ व्यंकटेश रेड्डी घुसले. त्यांनी तरुणीशी गैरवर्तन करून मनाला लज्जा निर्माण होईल, अशी कृती केली. फिर्यादीचा मित्र याने याविषयी आरोपींना जाब विचारला असता, त्यांनी त्याला शिवीगाळ करत मारहाण केली, असे फिर्यादीत नमूद आहे.

Web Title: Girl molested by room owner in Hindwadi; Filed a case