"माझं लग्न लावून द्या नाहीतर मी मरेन..."; पिंपरीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग, गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2022 18:50 IST2022-08-20T18:47:46+5:302022-08-20T18:50:01+5:30

अल्पवयीन मुलगी क्लासला जाताना आरोपीने त्याच्याशी फोनवर बोलण्याचा आग्रह....

"Get me married or I'll die..."; Rape of minor girl in Pimpri, case registered | "माझं लग्न लावून द्या नाहीतर मी मरेन..."; पिंपरीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग, गुन्हा दाखल

"माझं लग्न लावून द्या नाहीतर मी मरेन..."; पिंपरीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग, गुन्हा दाखल

पिंपरी : क्लासला जाणाऱ्या अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिला त्रास देण्यात आला. शिवाय तिच्या आई-वडीलांकडे माझे लग्न लावून द्या नाहीतर मी माझ्या जीवाचे बरेवाईट करून घेतो, अशी धमकी दिली. ही घटना मंगळवारी (दि.१६) घडली. या प्रकरणी महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी आरोपी विरोधात ‘पोस्को’ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी क्लासला जाताना आरोपीने त्याच्याशी फोनवर बोलण्याचा आग्रह केला. मुलीने त्याला विरोध केला असता आरोपीने तिचा पाठलाग केला. आरोपी बुधवारी (दि.१६) रात्री १०.३० च्या सुमारास मुलीच्या घरी आला.

मुलीच्या आई वडिलांना माझे तुमच्या मुलीवर प्रेम आहे. माझे लग्न तिच्याशी लग्न लावून द्या नाहीतर मी माझ्या जीवाचे बरे वाईट करेल, अशी धमकी दिली. असे फिर्यादीत नमूद केले आहे.

Web Title: "Get me married or I'll die..."; Rape of minor girl in Pimpri, case registered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.