कासारवाडीत घरगुती गॅसचा स्फोट; पाच जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2018 15:34 IST2018-12-31T15:27:39+5:302018-12-31T15:34:58+5:30
कासारवाडी येथे घरगुती ्रसिलेंडरमधून गॅसगळतीमुळे होवून झालेल्या स्फोटात घराला आग लागली.

कासारवाडीत घरगुती गॅसचा स्फोट; पाच जण जखमी
पिंपरी : कासारवाडी येथे घरगुती ्रसिलेंडरमधून गॅसगळतीमुळे होवून झालेल्या स्फोटात घराला आग लागली. या घटनेत पाचजण जखमी झाले असून यामध्ये तीन लहान मुलांचा समावेश आहे. ही घटना कासारवाडीतील केशवनगर येथील गुरुनाथ कॉलनीत सोमवारी सकाळी घडली.
शोभा बिरादार (वय ३०), गणेश बिरादार (वय ८), देवांश बिरादार (वय ३), शुभम बिरादार (वय ५), विजय जाधव (वय २२) अशी या घटनेत जखमी झालेल्यांची नावे आहेत. गुरुनाथ कॉलनीत बिरादार कुटुंबिय राहत आहे. त्यांच्या घरातील सिलेंडरमधून गॅसची रात्रभर गळती झाली. तसेच सकाळी या गॅसचा आगीशी संपर्क आल्याने स्फोट झाला. यामुळे घरात मोठी आग लागली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. या घटनेत घरातील साहित्याचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. जखमींवर पिंपरीतील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.