थेरगावात हत्याराचा धाक दाखवून टोळक्याने एकास लुटले
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2019 14:14 IST2019-08-10T14:09:26+5:302019-08-10T14:14:34+5:30
दुचाकीवरुन येऊन दहा ते बारा जणांच्या टोळक्याने कोयता, लोखंडी रॉडच्या सहाय्याने दहशत करत एकास जबर मारहाण करत लुटले.

थेरगावात हत्याराचा धाक दाखवून टोळक्याने एकास लुटले
हिंजवडी : दुचाकीवरुन येऊन दहा ते बारा जणांच्या टोळक्याने कोयता, लोखंडी रॉडच्या सहाय्याने दहशत करत एकास जबर मारहाण करत लुटले. थेरगाव पडवळ नगर येथे ही घटना घडली. टोळक्याने पंधरा हजाराचा मुद्देमाल चोरून नेला आहे. याप्रकरणी पोलीसांनी टोळक्याविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार करण अर्जुन आहेर (वय २१ रा. रावेत पुणे) असे हल्ला करून लुटण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून त्यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
याप्रकरणी अनिकेत चौधरी, अभिजीत टेकाळ, सुमीत पंडीत, मोईज शेख, जुबेर, बाळा लोखंडे यांना अटक करण्यात आली असून इतर चार ते पाच साथीदार फरार झाले आहेत. आरोपी अनिकेत चौधरी आणि त्याच्या साथीदारांनी गुरुवार (दि. ८) रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास थेरगावातील पडवळनगर येथे दुचाकीवरुन येऊन फिर्यादी करण आहेर यास लुटण्याच्या इराद्याने लोखंडी कोयता आणि लोखंडी रॉडच्या सहाय्याने दहशत निर्माण करत जबर मारहाण केली तसेच खिशातून दहा हजार रुपयांचा एक मोबाईल आणि पाच हजार रुपये रोख असा एकुण पंधरा हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. सहाय्यक पोलीस निरीक्षक तानाजी भोगम अधिक तपास करत आहेत.