भरदिवसा दरोड्याच्या तयारीतील चौघा जणांची टोळी जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2019 20:25 IST2019-11-28T20:24:06+5:302019-11-28T20:25:08+5:30
भरदिवसा कंपनीमध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीचा डाव चाकण पोलिसांनी उधळून लावला.

भरदिवसा दरोड्याच्या तयारीतील चौघा जणांची टोळी जेरबंद
पिंपरी : भरदिवसा कंपनीमध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीचा डाव चाकण पोलिसांनी उधळून लावला. टोळीतील चार जणांना पोलिसांनीअटक केली आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास खालूंब्रे गावाजवळ मेरियट हॉटेलसमोर घडली आहे.
चाकण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पांडुरंग किसन पडवळ (वय २९, रा. पडवळ वस्ती, शेलू चाकण), अबिद मोहम्मद शब्बीर हुसैन (वय ३२, रा. पुरेना, तुलसीपूर, जि. बलरामपूर, उत्तरप्रदेश), मकसूद बिसमिल्ला खान (वय ३२, रा. घाटकोपर, मुंबई) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. सलीम (रा. कळंबोली, ठाणे) हा पसार आहे.
पोलीस शिपाई शरद शांताराम खैरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करून वासुली येथील एमआयडीसी परिसरातील कंपनीत दरोडा टाकण्याचा कट रचला होता. हा दरोडा टाकण्यासाठी त्यांनी संपूर्ण तयारी केली. चाकण पोलिसांना माहिती मिळाली की, खालूंब्रे गावाजवळ एच. पी. चौकात मेरीयट हॉटेल समोर काहीजण संशयितरित्या फिरत आहेत. जवळच असलेल्या कंपनीची ते रेकी करत आहेत. त्यानुसार, पोलिसांनी परिसरात सापळा रचून चार जणांना ताब्यात घेतले. त्यांचा एक साथीदार पळून गेला.ह्णह्ण
कसून चौकशी सुरू
एमआयडीसी परिसरातील कंपनीत दरोडा टाकण्याचा कट रचनाणाºया आरोपींची कसून चौकशी सुरू आहे. ताब्यात घेतलेल्या चार जणांकडून घातक शस्त्र, लोखंडी कटावणी, हेक्सा ब्लेड, मिरची पावडर असे साहित्य जप्त करण्यात आले आहे. यातून आणखी काही गुन्हे उघड होण्याच्या दृष्टीने चाकण पोलीस तपास करीत आहेत