शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

हनी ट्रॅपद्वारे व्यावसायिकाला लुटणारी टोळी जेरबंद; तरुणीसह ६ जणांना ७२ तासात अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2021 21:50 IST

न्यू पनवेलच्या एका व्यावसायिकाने मात्र, पोलिसांकडे जाण्याचे धाडस केले अन कोंढवा पोलिसांनी या तरुणीसह ६ जणांना ७२ तासांच्या आत अटक केली.

पुणे : केवळ ९ वी पास असलेल्या पण सोशल मिडियाचा वापर करण्यात पटाईत. पतीच खुनाच्या गुन्ह्यात कारागृहात गेलेला तर, पतीचा मित्रही गुन्हेगार, अशा या गुन्हेगार मित्राच्या मदतीने हनीट्रॅपचा सापळा लावून आजवर अनेकांना लुबाडले.

न्यू पनवेलच्या एका व्यावसायिकाने मात्र, पोलिसांकडे जाण्याचे धाडस केले अन कोंढवा पोलिसांनी या तरुणीसह ६ जणांना ७२ तासांच्या आत अटक केली. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी कोंढवा तपास पथकाचे पोलीस उप निरीक्षक प्रभाकर कापुरे व त्यांच्या पथकाचे कौतुक केले आहे,रविंद्र भगवान बदर (वय २६, रा. इंदापूर), सचिन वासुदेव भातुलकर (रा. येवलेवाडी), आण्णा राजेंद्र साळुंके (वय ४०, रा. गोकुळनगर कोंढवा), अमोल साहेबराव ढवळे (वय ३२, रा.बाणेर मुळ सोलापूर माढा), मंथन शिवाजी पवार (वय २४, रा. इंदापूर), आणि १९ वर्षाची तरुणी अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

या टोळीतील १९ वर्षाच्या तरुणीने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून पनवेलच्या व्यवसायिकासोबत ओळख निर्माण केली. त्यातूनच मैत्री करत त्यांना तरुणीने जाळ्यात खेचले. तिने व्यवसायिकाला भेटण्यासाठी कोंढव्यातील येवलेवाडी येथे बोलावून जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवण्यास भाग पाडले. या तरुणीच्या साथीदारांनी व्यवसायिकाकडे ५० लाखाच्या खंडणीची मागणी केली. यावेळी व्यवसायिकाच्या खिशातील ५० हजाराची रोकड व त्यांच्या जवळील एटीएम कार्डद्वारे ३० हजार असे ७० हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. पाच लाख रुपये देण्याचे ठरल्यानंतर आरोपी व्यवसायिकाला सतत फोन करत होते. शेवटी त्यांनी कोंढवा पोलिसात धाव घेत फिर्याद दाखल केली होती.तांत्रिक विश्लेषनाद्वारे पोलीस अंमलदार गणेश चिंचकर यांना मिळालेल्या माहितीवरुन पोलिसांनी आरोपींना बोपदेव घाट गारवा हॉटेल येथून अटक केली. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. अटक टोळीतील रविंद्र बदर हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. तरुणीच्या पतीसोबत त्याची मैत्री होती. त्यातूनच त्याने संबंधीत तरुणी व तिच्या भावाला एकत्र करून येवलेवाडी परिसरात एक फ्लॅट भाड्याने घेतला होता. तेथून तो ही हनीट्रॅप टोळी चालवत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

कोंढवा तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे, हवालदार योगेश कुंभार, गणेश चिंचकर, महेश राठोड, अभिजित रत्नपारखी व त्यांच्या सहकार्यांनी ही कामगिरी केली.

पैसे मागण्यासाठी संपर्क केला अन जाळ्यात अडकले

फिर्यादी यांना या टोळीने प्रकरण मिटविण्यासाठी ५० लाखांची मागणी करुन ५ लाख रुपये देण्याचे ठरले होते. घटना घडली. त्यावेळी त्यांनी ७० हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले होते. राहिलेले ४ लाख रुपयांसाठी आरोपी फिर्यादीला फोन करत होते. या व्यवसायिकाने फिर्याद देताना याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करुन आरोपींचा माग काढला. त्यानंतर सर्वांना अटक केली. त्यांच्याकडील मोबाईलमध्ये त्यांनी अनेकांशी असा संवाद साधला असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे त्या मोबाईलची सायबर तज्ञांकडून तपासणी करण्यात येणार आहे.

संपर्क साधण्याचे पोलिसांचे आवाहनही तरुणी सोशल मिडियावर प्रगती जाधव या नावाने संपर्क साधून ओळख करायची. ओळख वाढवून त्याला पुण्यात भेटायच्या बहाण्याने बोलवयाची. त्याच्याशी भाड्याने घेतलेल्या फ्लॅटवर शरीरसंबंध प्रस्थापित करत असे. त्यानंतर त्या टोळीतील इतर जण या सावजाला अडवून मारहाण करुन ब्लॅकमेल करीत व त्याच्याकडून पैसे लुबाडत असत. या टोळीने अनेकांना अशा प्रकारे लुबाडले असण्याची शक्यता आहे. अनेकांनी भितीपोटी किंवा अब्रुला घाबरुन तक्रार देण्यास पुढे आलेले दिसत नाही. अशा प्रकारे कोणाची फसवणूक झाली असेल तर त्यांनी कोंढवा पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकfraudधोकेबाजी