डेटिंग अ‍ॅपवरील मैत्री पडली महागात; लग्नाच्या अमिषाने विधवेवर बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2021 11:49 IST2021-01-11T11:48:51+5:302021-01-11T11:49:16+5:30

लग्नाबाबत विचारले असता आरोपीने महिलेच्या तोंडावर बूट फेकून मारला आणि लग्नाला नकार दिला.

Friendships on dating apps cost more; Widow raped for the sake of marriage | डेटिंग अ‍ॅपवरील मैत्री पडली महागात; लग्नाच्या अमिषाने विधवेवर बलात्कार

डेटिंग अ‍ॅपवरील मैत्री पडली महागात; लग्नाच्या अमिषाने विधवेवर बलात्कार

पिंपरी : सोशल मीडियाचा गैरवापर करून अत्याचाराचे प्रकार सातत्याने समोर येत आहेत. अशाचप्रकारे टिंडर डेटिंग अ‍ॅपवरील तरुणाशी झालेली ओळख एका विधवेला महागात पडली आहे. अ‍ॅपवरील ओळखीने मित्र झालेल्या तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. हा प्रकार १२ जून ते २४ सप्टेंबर २०२० या कालावधीत घडला.

अमन दीपक सिंग (वय २९, रा. डांगे चौक, थेरगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पीडित महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी आणि पीडित महिलेची टिंडर या डेटिंग अ‍ॅपवरून ओळख होऊन मैत्री झाली. महिला विधवा असल्याचे आरोपील माहीत होते. त्याने महिलेला लग्नाचे आमिष दाखविले. ताथवडे, पुनावळे, मारुंजी येथील हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला. लग्नाबाबत विचारले असता आरोपीने महिलेच्या तोंडावर बूट फेकून मारला आणि लग्नाला नकार दिला.

Web Title: Friendships on dating apps cost more; Widow raped for the sake of marriage