इन्स्टाग्रामवरील मैत्री पडली महागात! पोलिस असल्याचे सांगून शारीरिक सुखाची मागणी
By नारायण बडगुजर | Updated: March 2, 2024 17:28 IST2024-03-02T17:26:45+5:302024-03-02T17:28:02+5:30
‘ब्लॅकमेल’ करून तिच्याकडून पैसे घेऊन लग्नाची तसेच शारीरिक सुखाची मागणी केली....

इन्स्टाग्रामवरील मैत्री पडली महागात! पोलिस असल्याचे सांगून शारीरिक सुखाची मागणी
पिंपरी :इन्स्टाग्रामवरूनपोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) असल्याचे सांगून तरुणीशी ओळख वाढविली. त्यानंतर चॅटिंग व फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. ‘ब्लॅकमेल’ करून तिच्याकडून पैसे घेऊन लग्नाची
तसेच शारीरिक सुखाची मागणी केली. वाकड येथे ४ जानेवारी ते १ मार्च २०२४ या कालावधीत हा प्रकार घडला.
याप्रकरणी २४ वर्षीय तरुणीने वाकडपोलिस ठाण्यात फिर्याद दिली. शुभम राठोड (३०, रा. चिंचवड) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम याने ‘पीएसआय शुभम राठोड’ या नावाच्या इन्स्टाग्राम आयडीवरून दुसऱ्याच एका पीएसआयचा फोटो वापरून त्यावरून व्हाटसअप तसेच काॅल करून तरुणीशी संपर्क साधला. पीएसआय असल्याचे सांगून त्याने तरुणीशी ओळख वाढविली. तिच्याशी लग्न करायचे आहे, असे सांगून तिचे फोटो प्राप्त केले. ते फोटो व चॅटिंग व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्याकडून वेळोवेळी फोन पे व्दारे आठ हजार आठशे रुपये ब्लॅकमेल करून घेतले.
त्यानंतर आणखी पैशांची मागणी केल्याने तरुणीने त्याला नकार दिला. त्यामुळे शुभम याने वारंवार फोनवरून, व्हाटसअपवरून लग्नाची, शारीरिक सुखाची व पैशांची मागणी केली. त्यामुळे तरुणीने पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली. सहायक पोलिस निरीक्षक अर्जून पवार तपास करीत आहेत.