बनावट कागदपत्रे तयार करून तब्बल ६ कोटी ८३ लाखांची फसवणूक,भोसरीत गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2021 17:53 IST2021-03-23T17:53:26+5:302021-03-23T17:53:40+5:30
खोट्या टीसी, खोटे इनवॉईस बिल व बनावट कागदपत्रे बनवून फिर्यादी यांच्या संस्थेची सहा कोटी ८३ लाख सात हजार ६७८ रुपयांची आर्थिक फसवणूक केली.

बनावट कागदपत्रे तयार करून तब्बल ६ कोटी ८३ लाखांची फसवणूक,भोसरीत गुन्हा दाखल
पिंपरी : लोखंडी मालाचा पुरवठा केल्याचे दाखवून त्याबाबत खोटी कागदपत्रे तयार केली. त्याआधारे सहा कोटी ८३ लाख सात हजार ६७८ रुपयांची फसवणूक केली. पीसीएनटीडीए भोसरी येथे २०१८ ते २०२० या कालावधीत हा प्रकार घडला.
मथु के. नरसिंव्हा, बाळासाहेब डोके, नीलेश कदम, ज्ञानेश्वर गुळींग, संचालक, गंगा आयर्न अँड स्टील ट्रेडिंग कंपनी ली. मुंबई, संचालक सुदर्शन फोर्ज अँड स्टील वर्ल्ड पिंपरी, संचालक प्रीती इंटरनॅशनल (गोपाल ओ. रुईया एच. यु. एफ.) मुंबई, संचालक रुईया अलॉय प्रा. ली. मुंबई यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सत्यानंद सूर्यनाथ सिंग (वय ६२, रा. दहिसर इस्ट, मुंबई) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मथु, बाळासाहेब, निलेश आणि ज्ञानेश्वर हे फिर्यादी यांच्या सिंग अँड सन्स फर्म या कंपनीत काम करत होते. त्यांनी अन्य आरोपींशी संगनमत करून २०१८ ते २०२० या कालावधीत लोखंडी मालाचा पुरवठा केल्याचे दाखवले. त्याबाबत खोट्या टीसी, खोटे इनवॉईस बिल व बनावट कागदपत्रे बनवून फिर्यादी यांच्या संस्थेची सहा कोटी ८३ लाख सात हजार ६७८ रुपयांची आर्थिक फसवणूक केली.