शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेत नोकरी लावण्याच्या आमिषाने २१ लाखांची फसवणूक

By नारायण बडगुजर | Updated: March 15, 2025 17:04 IST

ठेकेदार कंपनीसह इतर दोघांवर पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेत नोकरीला लावतो, असे आमिष दाखवून २१ लाख २० हजार रुपये घेतले. मात्र, नोकरीला न लावता तसेच रक्कम परत न करता फसवणूक केली. याप्रकरणी महापालिकेच्या ठेकेदार कंपनीसह इतर दाेघांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यालय आणि पिंपरी येथील एका हाॅटेलमध्ये सप्टेंबर २०२३ ते २८ जून २०२४ या कालवधीत हा प्रकार घडला.

सचिन छब्बानी सूर्यवंशी, मिलिंद पाध्ये व एजी इन्व्हायरो कंपनी यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अमोल भास्कर गर्जे (३५, रा. मोशी प्राधिकरण) यांनी याप्रकरणी शुक्रवारी (१४ मार्च) पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अमोल गर्जे यांना संशयित सचिन सूर्यवंशी आणि कंपनीच्या नियुक्तीपत्रावर स्वाक्षरी असणारा संशयित मिलिंद पाध्ये आणि इन्व्हायरो कंपनी यांनी नोकरीला लावतो असे आमिष दाखवले.फिर्यादी गर्जे यांचा विश्वास संपादन करून गर्जे यांच्याकडून व त्यांच्या साथीदारांकडून २१ लाख २० हजार रुपये ऑनलाइन तसेच रोख स्वरुपात घेतले. मात्र, कोणत्याही प्रकार नोकरी दिली नाही. फिर्यादीने पैशांची वारंवार मागणी करून देखील संशयितांनी त्यांना पैसे परत न देता त्यांच्या पैशांचा अपहार केला. तसेच अश्विनी गायसमुद्रे आणि विशाल खांदवे यांच्या पैशांचा देखील अशाच प्रकारे अपहार करून फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद आहे. पोलिस निरीक्षक धनंजय कापरे तपास करीत आहेत. 

सुपरवायजर, आरोग्य विभागात नोकरीचे आमिषएजी इन्व्हायरो कंपनी ही महापालिकेतील ठेकेदार कंपनी आहे. ही कंपनी सुपरवायजर तसेच आरोग्य विभागातील विविध पदांसाठी भरती करत असते. फिर्यादी गर्जे आणि त्यांच्या साथीदारांना देखील सुपरवायजर आणि इतर पदांवर नोकरी लावण्याच्या आमिषाने गंडा घालण्यात आला. 

किती जणांची फसवणूक?

या प्रकरणात संशयितांनी आणखी किती जणांची नोकरीच्या आमिषाने फसवणूक केली याबाबत चौकशी सुरू आहे. अशा प्रकारे फसवणूक झाली असल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPune Crimeपुणे क्राईम बातम्याPoliceपोलिसfraudधोकेबाजी