Pune Crime: चिनी कंपनीचा बनावट ईमेल आयडी तयार करून ९ लाखांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2021 19:39 IST2021-12-09T19:14:42+5:302021-12-09T19:39:49+5:30
फिर्यादी हे चीनमधील नानजिंग जेईरूम कॉ ली या कंपनीसोबत ट्रेडिंगचा व्यवसाय करतात....

Pune Crime: चिनी कंपनीचा बनावट ईमेल आयडी तयार करून ९ लाखांची फसवणूक
पिंपरी : चिनी कंपनीच्या नावाने मेलआयडी तयार करून व्यावसायिकाची नऊ लाख २३ हजार रुपयांची फसवणूक केली. साई कंट्रोल सिस्टीम, एमआयडीसी भोसरी येथे ८ मार्च २०२१ रोजी हा प्रकार घडला. सोपान विठ्ठल वेळे (वय ५३, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी याप्रकरणी बुधवारी (दि. ८) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार बनावट मेल तयार करणाऱ्या अज्ञात व्यक्तीच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे चीनमधील नानजिंग जेईरूम कॉ ली या कंपनीसोबत ट्रेडिंगचा व्यवसाय करतात. या कंपनीचा एका अनोळखी इसमाने बनावट मेल आयडी तयार केला. त्यावरून फिर्यादीला बीएनएल बँकेच्या एका अकाउंटमध्ये १२ हजार ६०० यूएस डॉलर (नऊ लाख २३ हजार ३२८ रुपये) पाठवा असे सांगितले. व्यावसायिक संबंध असल्याने फिर्यादीने त्या खात्यावर पैसे पाठवले. अज्ञात आरोपीने फिर्यादीची फसवणूक केली.