मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले चार कामगार ; दापाेडीतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2019 20:22 IST2019-12-01T20:20:57+5:302019-12-01T20:22:47+5:30
जलनि्स्सारण वाहिनीचे काम सुरु असताना ढिगाऱ्याखाली चार कामगार गाडले गेले असल्याची धक्कादायक घटना दापाेडी येथे घडली आहे.

मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले चार कामगार ; दापाेडीतील घटना
पिंपरी : दापोडीतील गणेश गार्डनजवळ जलनिस्सारण वाहिनीच्या कामासाठी खोदलेल्या खड्यात चार जण गाडले गेले असून अग्निशामक दल आणि आपत्तीव्यवस्थापानाचे पथक दाखल झाले आहे. गाडलेल्या कामगारांना काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहे. ही घटना पावणसातच्या सुमारास घडली.
प्रत्यक्षदर्शिनी दिलेल्या माहितीनुसार, दापोडीतून महामार्गाकडे जाण्यासाठी रस्ता असून या रस्त्यावर गणेश गार्डन आहे. या रस्त्याच्या कडेने जलनिस्सारण वाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी चाळीस फुट खोल चर खोदले आहेत. आज सायंकाळी पावणे सातच्या सुमारास कामगार काम करीत असताना खड्डा खोदून रस्त्यावर ढिगारा केला होता. या ढिगाऱ्याची माती खड्यात पडल्याने चार जण गाडले गेले. उर्वरित कामगारांनी जीव वाचविण्यासाठी आरडाओरडा केला. यावेळी प्रत्यक्षदर्शिनी अग्निशामक दल आणि महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थानास माहिती दिली.
Maharashtra: Five people, including two fire brigade personnel trapped in a hole, that was dug for a drainage line in Dapodi area of Pune. pic.twitter.com/DgBP0cas3T
— ANI (@ANI) December 1, 2019
त्यानंतर काहीवेळातच अग्शिनशामक दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. दोन कामगारांना कामगारांना काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी अग्निशामक दलाचाही एक कर्मचारी खड्यात पडला. एडीआरएफच्या जवनांनाही पाचारण करण्यात आले आहे. गाडलेल्या कामगारांना काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.