शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

'मी इथला गाववाला आहे. मला हप्ता द्यायचा. नाहीतर..' चार दुकानदारांना मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 15:29 IST

हप्ता देण्यास नकार दिल्याने चार दुकानदारांना मारहाण; वाकड येथे दुकानांमधील साहित्य फेकले रस्त्यावर

पिंपरी : मी इथला गाववाला आहे. मला हप्ता द्यायचा. नाहीतर तुम्हाला इथे धंदा करू देणार नाही, अशी धमकी देत चार दुकानदारांना मारहाण केली. तसेच दुकानातील साहित्य रस्त्यावर फेकून दिले. त्यामध्ये एक पुस्तकाचे दुकान होते. त्यातील पुस्तकेदेखील रस्त्यावर फेकून दिली. याप्रकरणी सहा संशयितांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. वाकड येथे फिनिक्स माॅलच्या समाेरील पदपथावर रविवारी (दि. २३) रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली.अमोल किसन कलाटे (वय ३८), अविनाश किसन कलाटे (४०, दोघे रा. वाकड), कौस्तुभ पवार आणि इतर तीन संशयितांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अमोल कलाटे आणि अविनाश कलाटे यांना पोलिसांनी अटक केली. सागर अशोक शिंदे (२७, रा. वाकड) यांनी याप्रकरणी सोमवारी (दि. २४ फेब्रुवारी) वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिनिक्स माॅलच्या समोरील पदपथावर सागर शिंदे यांचा लव्ह मोमोज नावाने हातगाडा आहे. तसेच इतर दुकानेदेखील आहेत. रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास संशयित हे कारमधून आले. धंदा करायचा असेल तर हप्ता द्यावा लागेल, म्हणत हप्त्याची मागणी केली. फिर्यादी शिंदे यांनी हप्ता देण्यास नकार दिला. या कारणावरून अमोल कलाटे याने शिंदे यांना मारहाण केली. शिंदे यांच्या शेजारी असलेल्या बर्गरचा दुकानदार सलमान अन्सारी, पाणीपुरी विक्रेता जितलाल, पुस्तक विक्री करणारा विशाल यांनादेखील हप्त्याची मागणी करत मारहाण केली. तसेच सर्व दुकानांमधील साहित्य रस्त्यावर फेकून हातगाडी आणि खाद्यपदार्थाचे नुकसान केले.‘मी इथला गाववाला आहे. मला हप्ता द्यायचा. नाहीतर तुम्हाला इथे धंदा करू देणार नाही, असे म्हणून संशयिताने मोठमोठ्याने आरडा ओरडा करून दहशत माजवली. त्यानंतर संशयित पळून गेले. पोलिस उपनिरीक्षक अतुल जाधव तपास करीत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक