वडगाव मावळ येथे फार्म हाऊसवर दरोडा टाकणा-या चारजणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 15:00 IST2018-08-06T15:00:11+5:302018-08-06T15:00:46+5:30
दोन महिन्यांपूर्वी भडवली येथील मयुरीका पोतदार फार्महाऊसवर रखवालदाराला चाकूचा धाक दाखून त्याला मारहाण करत त्याला लुटले होते.

वडगाव मावळ येथे फार्म हाऊसवर दरोडा टाकणा-या चारजणांना अटक
मावळ : मावळ तालुक्यातील भडवली येथील एका फार्म हाऊसवर रखवालदाराला चाकूचा धाक दाखवत दरोडा टाकणाऱ्या चार दरोडेखोरांना वडगाव पोलिसांनीअटक केली आहे.
याप्रकरणी संतोष चंद्रकांत औझरकर (रा.औझरडे) रामदास पांडुरंग खैरे , अक्षय प्रताप मसुलगे (दोघेही रा.सडवली), संदिप काळूराम गायकवाड (रा.कांब्रे) अशी अटक केलेल्यांची नावे आहे. या गुन्ह्यातील समीर गोपाळ गायकवाड व बाबा अरूण गायकवाड (दोघेही रा.कांब्रे) हे अद्यापही फरार आहेत. वडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन महिन्यांपूर्वी भडवली येथील मयुरीका पोतदार फार्महाऊसवर रखवालदाराला चाकूचा धाक दाखून त्याला मारहाण करून त्याच्या जवळील आठ हजार रुपये व मोबाईल घेऊन पसार झाले होते. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक डी. जी. हाके याच्या मार्गदशॅनाखाली सहायक पोलीस निरीक्षक गणेश लोहकरे ,पोलीस हवालदार विश्वास आंबेकर, रविंद्र राय, चंदु सोनवणे, शशिकांत लोंढे, अजित शिंदे यांनी सापळा रचून अटक केली.