तळेगाव - चाकण रस्त्यावर जळालेल्या अवस्थेत आढळला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2019 20:49 IST2019-07-11T20:47:30+5:302019-07-11T20:49:32+5:30
इंदोरी (ता. मावळ) गावच्या हद्दीत ४५ ते ५० वर्षे वयोगटातील इसमाचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. हा प्रकार बुधवारी (दि. ९) सकाळी पावणेदहाच्या सुमारास उघडकीस आला. मृत तरुणाची अद्याप ओळख पटलेली नाही.

तळेगाव - चाकण रस्त्यावर जळालेल्या अवस्थेत आढळला मृतदेह
तळेगाव दाभाडे : इंदोरी (ता. मावळ) गावच्या हद्दीत ४५ ते ५० वर्षे वयोगटातील इसमाचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. हा प्रकार बुधवारी (दि. ९) सकाळी पावणेदहाच्या सुमारास उघडकीस आला. मृत तरुणाची अद्याप ओळख पटलेली नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी पावणेदहाच्या सुमारास तळेगाव - चाकण रस्त्याच्या कडेला इंदोरी गावच्या हद्दीत अज्ञात इसमाचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत असल्याची माहिती तळेगाव एमआयडीसी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता एका इसमाचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह रस्त्यापासून सुमारे २०० मीटर अंतरावर पडलेला आढळला. तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यातआला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्रकुमार राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक साधना पाटील करीत आहेत.