शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
4
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
5
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
6
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
7
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
8
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
9
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
10
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
11
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
13
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
14
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
15
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
16
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
17
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
18
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
19
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
20
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 

स्थायीत वाढीव खर्चाचा धडाका

By admin | Published: May 11, 2016 12:24 AM

महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या असलेल्या स्थायी समितीने वाढीव आणि सुधारित खर्चाचा धडाका लावला आहे. ऐनवेळी विषय घुसडून कोट्यवधी रुपयांच्या वाढीव

पिंपरी : महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या असलेल्या स्थायी समितीने वाढीव आणि सुधारित खर्चाचा धडाका लावला आहे. ऐनवेळी विषय घुसडून कोट्यवधी रुपयांच्या वाढीव खर्चाला मंजुरी घेण्याचा सपाटाच लावला आहे. मंगळवारी झालेल्या स्थायीच्या सभेत तीन ऐनवेळच्या विषयांच्या माध्यमातून सुमारे ९० लाखांच्या वाढीव खर्चास मंजुरी दिली. स्थायी समिती ठेकेदारांवर मेहेरबान झाल्याचे दिसून येत आहे. सभेच्या अध्यक्षस्थानी डब्बू आसवानी होते. वाढीव खर्चाच्या विषयांना ऐनवेळी मंजुरी दिली जात असून, स्थायीतील सर्वपक्षीय सदस्यांनी ‘तेरी भी चूप मेरी भी चूप’ अशी भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. प्रभाग क्रमांक ४०मधील कामगारनगर, गंगानगर परिसरात जलनिस्सारण व्यवस्थेच्या कामासाठी १६ लाख ५३ हजार रुपये खर्चाला स्थायी समितीने फेबु्रवारी २०१६ला मंजुरी दिली होती. मंगळवारी पुन्हा या कामासाठी २१ लाख ७३ हजारांच्या वाढीव खर्चास मंजुरी देण्यात आली. प्रभाग क्रमांक ६१ दापोडी गावठाण एसएमएस कॉलनी परिसरात रेडमिक्स पद्धतीने काँक्रीट पेव्हिंग ब्लॉक, गटर्स करणे व स्थापत्यविषयक कामे करण्यासाठी स्थायी समितीने फेबु्रवारी २०१६मध्ये १८ लाखांच्या खर्चाला मंजुरी दिली होती. आता याच कामासाठी ३१ लाख ८० हजार रुपयांच्या वाढीव खर्चाला स्थायीने मंजुरी दिली आहे. यासह प्रभाग ६१मधील सांगवी पुलापर्यंतच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूने पदपथ बांधणे व रबर मोल्डिंग पेव्हिंग ब्लॉक बसविणे या कामासाठी १५ लाखांच्या खर्चास मार्च २०१६ला स्थायी समितीने मान्यता दिली आहे. याच कामासाठी ३४ लाखांच्या सुधारित खर्चास मंगळवारी मान्यता देण्यात आली आहे. अशा प्रकारे मंगळवारी स्थायी समितीने तीन ऐनवेळच्या विषयातून ९० लाखांच्या वाढीव खर्चास विनाचर्चा मंजुरी दिली. (प्रतिनिधी)