शहरं
Join us  
Trending Stories
1
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
2
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
3
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
4
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
5
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
6
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
7
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
8
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
9
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
10
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
11
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
12
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
13
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
14
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
15
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
16
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
17
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
18
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
19
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
20
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती

पाच वर्षीय चिमुरडीवर दोघा सुरक्षारक्षकांनी केला अत्याचार, दोघांना १९ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी  

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2017 8:19 PM

सोसायटीची सुरक्षा पाहणाऱ्या दोघा सुरक्षारक्षकांनीच पाच वर्षांच्या चिमुरडीवर आळीपाळीने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने परिसरात एकाच खळबळ उडाली आहे. 

वाकड, दि. 13 - सुरक्षारक्षक म्हटलं की प्रत्येकाला एक विश्वास, दिलासा आणि सुरक्षितता असल्याचे वाटते. सुरक्षा रक्षकांच्या जीवावर अनेक मोठ्या कंपन्या बँका, सोसायट्या आणि कार्यालयांची जबाबदारी सोपवून सर्वजण अगदी बिनधास्त असतात. मात्र, पिंपरी-चिंचवड शहरातील एका उच्चभ्रू सोसायटीत सुरक्षा रक्षकांच्या अघोरी प्रकाराने जणू कुंपणच शेत खाल्ल्याचा प्रत्यय आला. सोसायटीची सुरक्षा पाहणाऱ्या दोघा सुरक्षारक्षकांनीच पाच वर्षांच्या चिमुरडीवर आळीपाळीने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने परिसरात एकाच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करत दोघा नराधमांना वाकड पोलिसांनी बेड्या ठोकळया आहेत. तसेच, न्यायालयाने त्यांना ६ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. संजीत चासा (वय २०) आणि मंगल वैद (वय २३) अशी अटक करण्यात आलेल्या दोघा सुरक्षा रक्षकांची नावे आहेत. याबाबत वाकड ठाण्याच्या सहपोलीस निरीक्षक दीपाली आढाव यांनी दिलेली माहिती अशी की,  पाच वर्षांची चिमुरडी सोसायटीच्या पार्किंगमध्ये खेळत असताना नराधम सुरक्षारक्षकांनी खाऊचे अमिष दाखवून लिफ्ट शेजारील बाकड्यावर आळीपाळीने तिच्यावर अत्याचार केले. तसेच, याबाबत कुणालाही न सांगण्याची धमकीही तिला त्या दोघांनी दिली. हा प्रकार आठ दिवसांपूर्वी दोन तीन वेळा झाल्याचे त्या चिमुरडीने पोलिसांना सांगितले आहे.या अत्याचाराने ती जखमी झाल्याबाबत त्या नाराधम सुरक्षारक्षकांना सांगत असताना तीच्या मोठ्या भावाने ऐकले आणि त्याने तिच्या आई वडिलांनी सांगितले. त्यानंतर तिला विश्वासात घेऊन विचारले असता हा धक्कादायक प्रकार समोर आला तिच्या पालकांनी तात्काळ पोलिसांना कळविले. यावेळी सर्व सुरक्षा रक्षकांना पोलिसांनी तिच्या पुढे उभे केले असता तिने त्या दोन नराधमांना ओळखले. दरम्यान, याप्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहेत.

टॅग्स :Crimeगुन्हा