शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
2
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
3
ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
4
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
5
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
6
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
7
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
8
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
9
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
10
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
11
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
12
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
13
लॅपटॉप जास्त वेळ मांडीवर अन् फोन खिशात ठेवाल तर वडील होण्याचे स्वप्न राहील अधुरे; नपुंसक होण्याचा धोका
14
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
15
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
16
उत्तरकाशीच्या धरालीत १००हून अधिक लोक बेपत्ता; ४०० जणांना वाचवले, ३०० यात्रेकरू सुरक्षित
17
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
18
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
19
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
20
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'

डिलिव्हरी बॉयकडून सिगारेट चोरणाऱ्या पाच जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2020 19:09 IST

डिलिव्हरी बॉयला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने अडवून केली चोरी..

ठळक मुद्देदोन दुचाकी आणि सिगारेट असा एकूण एक लाख ३५ हजार रुपयांचा ऐवज जप्ततीन आरोपींवर विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल

पिंपरी : डिलिव्हरी बॉयला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने अडवून त्याच्याकडून एक लाख १५ हजार ८४४ रुपयांच्या सिगारेट जबरदस्तीने चोरून नेणाऱ्या पाच चोरट्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून एक लाख ३५ हजारांचा ऐवज जप्त केला आहे. वाकड पोलिसांनी ही कामगिरी केली आहे. अतुल चंद्रकांत निसर्गंध (वय २०), ओंकार उर्फ बाबू नंदकुमार वैराट (वय १९), अँथोनी डॅनियल अरकस्वामी (वय २०), राहुल प्रदीप शिंदे (वय २४, सर्व रा. घरकुल, चिखली),विकास पोपट वायकर (वय २१, रा. चºहोली) अशी अटक  केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी रोशन रमेश वाधवानी (वय ३९, रा. पिंपरी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वाधवानी यांचे पिंपरी येथील शगुन चौकात दुकान आहे. आशिष हरले त्यांच्याकडे सेल्समन म्हणून काम करतो. आशिष २७ डिसेंबर रोजी सकाळी दुचाकीवरून सिगारेटची डिलिव्हरी देण्यासाठी मारुंजी येथे जात होता. आरोपींनी त्याला थेरगाव येथे पत्ता विचारण्याच्या बहाण्याने थांबवले. त्यानंतर आशिष याला मारहाण करून त्याच्याकडील एक लाख १५ हजार ८४४ रुपये किमतीची सिगारेटची बॅग हिसकावून घेतली आणि आरोपींनी पोबारा केला. फिर्यादी वाधवानी कामानिमित्त मुंबई येथे गेले होते. मुंबईहून आल्यानंतर त्यांनी शनिवारी (दि. ४) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी आरोपींचा माग काढत थेरगाव, चिंचवड जकातनाका, बिजलीनगर पाण्याची टाकी, खंडोबा माळ चौक, थरमॅक्स चौक, कस्तुरी मार्केट, कृष्णानगर मार्गे चिखली या मार्गावरील ठिकठिकाणचे सुमारे ८० सीसीटीव्ही कॅमेºयांचे फॅुटेज तपासले. तसेच गोपनीय बातमीदारांकडून माहिती काढली. त्यानंतर चिखली परिसरात सापळा रचून आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली. त्यांच्याकडून दोन दुचाकी आणि सिगारेट असा एकूण एक लाख ३५ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.वाकड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त श्रीकांत मोहीते यांच्या मार्गदर्शनाखाली वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजकुमार राजमाने, सहायक पोलीस निरीक्षक हरिष माने, पोलीस उपनिरीक्षक सिद्धनाथ बाबर, तपास पथकातील पोलीस कर्मचारी बिभीषण कन्हेरकर, बापुसाहेब धुमाळ, प्रमोद भांडवलकर, तात्या शिंदे, प्रशांत गिलबिले यांनी ही कामगिरी केली.

तीन आरोपींवर विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखलपोलिसांनी अटक केलेल्या पाच आरोपींपैकी तिघांवर विविध पोलीस ठाण्यांमध्ये विविध स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. यातील आरोपी अतुल निसर्गंध याच्याविरोधात चाकण, देहुरोड, निगडी आणि वाकड या पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. आरोपी अँथोनी अरकस्वामी याच्यावर चिखली, तर आरोपी राहुल शिंदे याच्याविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCigaretteसिगारेटtheftचोरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस