दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2019 20:24 IST2019-04-12T19:58:22+5:302019-04-12T20:24:10+5:30
कार्ला येथील एकविरा देवीच्या परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांना पुणे ग्रामीण दलातील गुन्हे वेषन शाखेतील पोलिस सापळा रचून पाच जणांना अटक केली. त्यांचा कडून ४ लाख ७४ रुपयांचा ऐवज जप्त केला.

दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांना अटक
वडगाव मावळ :कार्ला येथील एकविरा देवीच्या परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांना पुणे ग्रामीण दलातील गुन्हे वेषन शाखेतील पोलिस सापळा रचून पाच जणांना अटक केली. त्यांचा कडून ४ लाख ७४ रुपयांचा ऐवज जप्त केला.
नितीन सिद्राम जाधव वय २५ , अमर बाबुलाल गायकवाड वय २३, विश्वनाथ शिवाजी जाधव वय ४५, किसन उर्फ किरण लक्ष्मण गायकवाड, राहुल श्रीमंत गायकवाड सर्व रा. सोलापूर अशी अटक केलेल्यांची नावे आहे.गुन्हेवेषन शाखेचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री गस्त घालत असताना एका बातमी दाराकडून माहिती मिळाली की सहा ते सातजन जीप मधून एकविरा देवीच्या उत्सव परिसरात भाविकांना लुटण्यासाठी आले आहेत. त्यानंतर वाकसई येथे बलोरो जीप क्रमांक एम एच ४५ एन ५३५८ ही आली असता. तीला थांबवली त्यातील सहा ते सात जन पळून गेले पाठलाग करून त्यातील पाच जणांना पकडले. त्यांची झडती घेतली असता त्याच्या कडे कोयता, मोबाईल, रोख रक्कम, मिरची पावडर, व इतर दरोडा टाकण्यासाठी आणलेला साहित्य असे एकून ४ लाख ७४ हजार ५५० रुपयांचा ऐवज जप्त केला.
पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट, उपनिरीक्षक जिवन राजगुरु, सहायक फौजदार विजय पाटील, प्रकाश वाघमारे, रविंद्र शिनगारे, चंद्रकांत बागेवाडी, गणेश महाडिक, या पथकाने कारवाई केली.