पिंपरीत मित्रांसमवेत हॉटेलमध्ये चहा पीत असलेल्या तरुणावर गोळीबार; एक गंभीर जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2017 18:10 IST2017-09-15T18:10:46+5:302017-09-15T18:10:56+5:30

मित्रांसमवेत हॉटेलमध्ये चहा पीत असताना त्याठिकाणी आलेल्या हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात संतोष कुरावत हा तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना पिंपरीतील साधू वासवानी उद्यानाजवळील ओम शिव हॉटेलमध्ये  शुक्रवारी दुपारी घडली.

Firing on the youth drinking tea in hotels with friends; One seriously injured | पिंपरीत मित्रांसमवेत हॉटेलमध्ये चहा पीत असलेल्या तरुणावर गोळीबार; एक गंभीर जखमी 

पिंपरीत मित्रांसमवेत हॉटेलमध्ये चहा पीत असलेल्या तरुणावर गोळीबार; एक गंभीर जखमी 

पिंपरी-चिंचवड, दि. 15 - मित्रांसमवेत हॉटेलमध्ये चहा पीत असताना त्याठिकाणी आलेल्या हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात संतोष कुरावत हा तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना पिंपरीतील साधू वासवानी उद्यानाजवळील ओम शिव हॉटेलमध्ये  शुक्रवारी दुपारी घडली.

प्राथमिक माहितीनुसार, संतोष कुरावत  हे अन्य दोन मित्रांसोबत  हॉटेलमध्ये चहा पीत होते. त्याचवेळी त्याठिकाणी आलेल्या तिघाजणांनी संतोष याच्यावर कोयत्याने हल्ला केला. संतोष आणि त्याच्या तीन मित्रांनी हा हल्ल्यातून वाचण्यासाठी हॉटेलमधील वस्तू हल्लेखोरांच्या दिशेने फेकल्या. मात्र हल्लेखोरांनी संतोषच्या दिशेने गोळी झाडून पिस्तूल तिथेच टाकून तिघेजण पसार झाले.  यामध्ये संतोष गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर चिंचवडच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. संतोष याच्यावर विविध गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळत आहे. 

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकांत शिंदे, उपायुक्त गणेश शिंदे, वरिष्ठ निरिक्षक विवेक मुगळीकर यांनी घटनास्थळी धाव घेत पुढील तपासाबाबत सूचना दिल्या.  

Web Title: Firing on the youth drinking tea in hotels with friends; One seriously injured

टॅग्स :Crimeगुन्हा