Firing from criminal gang due to Supremacist in the Nigdi | गुन्हेगारी टोळीच्या वर्चस्ववादातून गोळीबार; निगडीतील प्रकार 

गुन्हेगारी टोळीच्या वर्चस्ववादातून गोळीबार; निगडीतील प्रकार 

ठळक मुद्देदोन जखमी; चाैघे अटकेत 

पिंपरी : भावाला मारहाण केल्याने तेथे गेलेल्या तरुणावर गोळीबार केला. यात तरुण जखमी झाला. तसेच त्याचा भाऊ देखील मारहाणीत गंभीर जखमी झाला. ओटास्किम, निगडी येथे बुधवारी (दि. २५) रात्री सव्वाअकराच्या सुमारास गुन्हेगारी टोळीच्या वर्चस्ववादातून गोळीबाराचा हा प्रकार घडला. याप्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. 

आकाश बसवराज दोडमणी (वय २३) व रवी बसवराज दोडमणी (वय २६, दोन्ही रा. ओटास्किम, निगडी), असे जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी तर आकाश दोडमणी याने फिर्याद दिली आहे. यश अतुल कदम उर्फ रघु (वय २०), विजय शिंदे उर्फ चोरगुंड्या (वय ३२), प्रदीप जगदाळे, विशाल सोळसे (सर्व रा. ओटास्किम, निगडी), असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तसेच किरण शिवाजी खवळे (वय २८, रा. ओटास्किम, निगडी), रोहन चंडालिया (वय २४, रा. जाधववस्ती, रावेत), मनोज हांडे (वय २५, रा. चिखली) यांच्यासह इतर १० जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

आरोपी खवळे, रघू, चोरगुंड्या, जगदाळे, सोळसे, चंडालिया, हांडे तसेच इतर १० जणांनी संगनमत करून फिर्यादी आकाश दोडमणी याचा भाऊ रवी दोडमणी याला लाथाबुक्क्यांनी, दगडाने मारहाण करून जखमी केले. कोणत्या कारणावरून भाऊ रवी याला मारहाण केली, हे पाहण्यासाठी फिर्यादी आकाश तेथे गेला. त्यावेळी आरोपी यांनी बेकायदेशीर जमाव जमविला. तू तेथेच थांब, आता तुला गोळी घालून ठार मारतो, असे बोलून आरोपी रघू, चंडालीया व हाडे यांच्यापैकी एकाने फिर्यादी यांच्या दिशेने पिस्तुलातून गोळी झाडली. आरोपी यांनी फिर्यादी यांना जीवे मारण्याचा व फिर्यादी यांचा भाऊ रवी दोडमणी यास गंभीर जखमी करून दहशत माजविली.

Web Title: Firing from criminal gang due to Supremacist in the Nigdi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.