सिलेंडरच्या स्फोटामुळे पत्र्याच्या घराला आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2019 14:22 IST2019-05-05T14:20:25+5:302019-05-05T14:22:40+5:30

घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत पत्र्याच्या घरातील साहित्य जळून खाक झाले .

fire to the house due to cylinder blast | सिलेंडरच्या स्फोटामुळे पत्र्याच्या घराला आग

सिलेंडरच्या स्फोटामुळे पत्र्याच्या घराला आग

पिंपरी : घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत पत्र्याच्या घरातील साहित्य जळून खाक झाले . ही घटना रविवारी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास पिंपळे गुरव येथे घडली. 

पिंपळे गुरव येथील अँग्रसिया सोसायटी शेजारील मोकळ्या मैदानात एक पत्र्याचे घर आहे. यामध्ये लिंगप्पा जांबे यांचे कुटुंब राहते. रविवारी सर्वजण कामानिमित्त बाहेर गेले होते. दरम्यान, सव्वा दहाच्या सुमारास घराला अचानक आग लागली. याबाबत अग्निशामक दलाला माहिती मिळताच अग्निशामक दलाचे  भगवान यमगर , विवेक खंदेवाड , महेंद्र पाठक , चेतन माने , रुपेश वानखेडे, दादासाहेब मोरे आणि संदीप जगताप यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाची पाहणी केली असता ही आग गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे लागल्याचे स्पष्ट झाले. या आगीमध्ये घरातील वस्तू इतर साहित्य जळून खाक झाले.

Web Title: fire to the house due to cylinder blast