चिंचवडमधून आकुर्डीकडे जाणाऱ्या रस्त्यावर दुचाकीने घेतला अचानक पेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2020 18:41 IST2020-01-25T18:39:22+5:302020-01-25T18:41:20+5:30

दैव बल्लतर असल्याने प्रसंगावधान पाहून चालकाने गाडी सोडुन पळ काढल्याने तो थोडक्यात बचावला.

Fire to Bike on the aakurdi road in chinchwad | चिंचवडमधून आकुर्डीकडे जाणाऱ्या रस्त्यावर दुचाकीने घेतला अचानक पेट

चिंचवडमधून आकुर्डीकडे जाणाऱ्या रस्त्यावर दुचाकीने घेतला अचानक पेट

ठळक मुद्देभर रस्त्यात पेटलेली गाडी पाहून अनेकांची धावपळ

पिंपरी चिंचवड : चिंचवड गावातून आकुर्डी कडे जाणाऱ्या रस्त्यावर सायंकाळी पावणेसहा वाजता एका दुचाकीने अचानक पेट घेतल्याने सर्वांचीच धावपळ झाली. दैव बल्लतर असल्याने प्रसंगावधान पाहून चालकाने गाडी सोडुन पळ काढल्याने तो थोडक्यात बचावला.आगीच्या झळात संपूर्ण गाडी खाक झाली.हा थरार पाहण्यासाठी घटनास्थळावर मोठी गर्दी झाली होती. सायंकाळची वेळ असल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू होती. रमेश पाचपुते हे दुचाकी घेऊन आकुर्डी कडे जात होते.इंदिरा नगर चौकात येताच त्यांच्या सी डी डीलक्स (एमएच १४ डीजी ६२०१) या दुचाकीने अचानक पेट घेतला.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही क्षणातच आगीच्या ज्वाला निघू लागल्या.प्रसंगावधान पाहून पाचपुते यांनी गाडी सोडून पळ काढला.भर रस्त्यात पेटलेली गाडी पाहून अनेकांची धावपळ झाली.रस्त्यावरील वाहतूक थांबविण्यात आली.पेटलेली गाडी काही क्षणात खाक झाली.घटनास्थळी बघ्यांची गर्दी वाढत गेली.अनेक जण पेटलेल्या गाडीचे चित्रीकरण करत होते.घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.अग्निशामक दलाचे वाहन घटनास्थळी हजर झाले.पेटलेल्या गाडीवर नियंत्रण मिळे पर्यंत गाडी संपूर्ण जळून खाक झाली होती.सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीत हानी झाली नाही.

Web Title: Fire to Bike on the aakurdi road in chinchwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.