अखेर मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाने घेतला मोकळा श्वास; सलग सुट्ट्यांमुळे झाली होती कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 12:46 IST2017-12-25T12:37:07+5:302017-12-25T12:46:29+5:30

वाहतूककोंडीने बेजार झालेल्या मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाने व खंडाळा घाटाने आज (सोमवार, दि. २५) मोकळा श्वास घेतल्याचे चित्र सकाळच्या वेळी पाहायला मिळाले.

Finally breathing Mumbai-Pune Expressway; Due to frequent vacations | अखेर मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाने घेतला मोकळा श्वास; सलग सुट्ट्यांमुळे झाली होती कोंडी

अखेर मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाने घेतला मोकळा श्वास; सलग सुट्ट्यांमुळे झाली होती कोंडी

ठळक मुद्देवाहतूककोंडीने यंत्रणा हतबल तर वाहनचालक व पर्यटक नागरिक झाले होते बेजाररात्री उशिरा खंडाळा घाटातील संपली कोंडी, सकाळपासून द्रुतगती मार्गाने घेतला मोकळा श्वास

लोणावळा : सलग सुट्टयांमुळे वाहतूककोंडीने बेजार झालेल्या मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाने व खंडाळा घाटाने आज (सोमवार, दि. २५) मोकळा श्वास घेतल्याचे चित्र सकाळच्या वेळी पाहायला मिळाले. मागील दोन दिवस द्रुतगती मार्गावर प्रचंड वाहतूककोंडी झाल्याने यंत्रणा हतबल तर वाहनचालक व पर्यटक नागरिक बेजार झाले होते.
शनिवार, रविवार व सोमवार हे ३ दिवस सलग सुट्ट्यांमुळे पर्यटनाचा आनंद घेण्याकरिता लाखोंच्या संख्येने पर्यटक वेगवेगळ्या पर्यटनस्थळांकडे निघाले. यामुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गासह, गोवा हायवे, नाशिक हायवे, सातारा हायवे, कोल्हापूर हायवसह सर्वच मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. 


मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर तर खालापूर टोलनाका ते खंडाळा एक्झिटपर्यंत पुणे मार्गीकेवर वाहनांची गर्दीच गर्दी झाल्याने ही कोंडी सोडविण्याचे मोठे आव्हान यंत्रणांच्या समोर उभे राहिले होते. रात्री उशिरा खंडाळा घाटातील वाहनांची कोंडी संपली व आज सकाळपासून द्रुतगती मार्गाने मोकळा श्वास घेतला असल्याचे चित्र पहायला मिळाले. अमृतांजन पूल परिसरातील तीव्र चढणीवर काहीशी रांग दिसत असली तरी आज कोठेही कोंडी नसल्याने वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Web Title: Finally breathing Mumbai-Pune Expressway; Due to frequent vacations