भीषण अपघातात तीन ठार, मुंबई - पुणे द्रुतगती मार्गावरील घटना : इनोव्हा कारचा टायर फुटून पाच गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 03:15 AM2017-12-21T03:15:57+5:302017-12-21T03:16:06+5:30

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मुंबईकडून पुण्याकडे जाणाºया कारचा मागचा टायर फुटल्याने गाडी नियंत्रणाबाहेर जाऊन पलटी मारून पुण्याकडून मुंबईला निघालेल्या कारवर आदळली. या भीषण दुर्घटनेत तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच गंभीर असून, दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत.

 Three killed in a horrific accident; Mumbai-Pune Expressway: Indo-Car's tire split five seriously | भीषण अपघातात तीन ठार, मुंबई - पुणे द्रुतगती मार्गावरील घटना : इनोव्हा कारचा टायर फुटून पाच गंभीर

भीषण अपघातात तीन ठार, मुंबई - पुणे द्रुतगती मार्गावरील घटना : इनोव्हा कारचा टायर फुटून पाच गंभीर

Next

खोपोली : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मुंबईकडून पुण्याकडे जाणाºया कारचा मागचा टायर फुटल्याने गाडी नियंत्रणाबाहेर जाऊन पलटी मारून पुण्याकडून मुंबईला निघालेल्या कारवर आदळली. या भीषण दुर्घटनेत तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच गंभीर असून, दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत.
बुधवारी सकाळी ९.३०च्या सुमारास मुंबई लेनवरून कारमधून ९ जण अ‍ॅडलॅब इमॅजिक पार्ककडे जात असताना खालापूर टोल प्लाझाजवळ कारचा उजव्या बाजूचा मागचा टायर फुटला. पहिल्या लेनवरून चाललेल्या कारच्या वेगाला अचानक ब्रेक लागला व ती उलटून मधोमध असलेल्या वायर बॅरियर्सना तोडून पुणे लेनवर गेली. त्याच वेळी पुण्याकडून मुंबईला निघालेल्या रिट्झ कारवर ती आदळली. या वेळी रिट्झ कारमध्ये असलेल्या अनंत नरेंद्र पारीख (५५ पुणे) यांचा मृत्यू झाला तर इतर दोघे गंभीर जखमी झाले. इनोव्हा कारमधील अस्मित तावडे (१९, रा. घाटकोपर), शुभम बोराडे (१९, रा. विक्रोळी) हे जागीच ठार झाले. तर तिघे गंभीर असून, दोघे किरकोळ जखमी झाले होते. आयआरबी पेट्रोलिंग व डेल्टा फोर्सच्या जवानांनी रिट्झ कारमधल्यांना बाहेर काढले. जखमींना कामोठ्याच्या एमजीएम रुग्णालयात हलवले. खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात येऊन मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले.
अपघातातील जखमी-
जखमींमध्ये राम प्रसाद (५०), आनंद पारीख (४०) (दोघेही राहणार पुणे) रिट्झ कारमध्ये होते तर सुभाष पलांडे (१९, रा. मुंबई), आदित्य आचार्य (२२, रा. विक्र ोळी), शुभम सरोज, सोहेल शहा, मोहोमद अझीझ हे इनोव्हा कारमध्ये होते.

Web Title:  Three killed in a horrific accident; Mumbai-Pune Expressway: Indo-Car's tire split five seriously

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात