आली लहर केला कहर : विनाकारण बसची तोडफोड एकावर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2019 16:18 IST2019-09-01T16:16:21+5:302019-09-01T16:18:27+5:30
रस्त्याने जात असलेल्या बसला अडवून तिची तोडफोड करण्यात आली. ही घटना शुक्रवारी (दि. ३०) रात्री नऊच्या सुमारास हिंजवडी येथे रेडिसन हॉटेल समोरील चौकात घडली.

आली लहर केला कहर : विनाकारण बसची तोडफोड एकावर गुन्हा
पिंपरी : रस्त्याने जात असलेल्या बसला अडवून तिची तोडफोड करण्यात आली. ही घटना शुक्रवारी (दि. ३०) रात्री नऊच्या सुमारास हिंजवडी येथे रेडिसन हॉटेल समोरील चौकात घडली. शरद तानाजी साखरे (रा. साखरे वस्ती हिंजवडी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी विठ्ठल महादेव साळुंके (वय ३०, रा. हडपसर) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विठ्ठल शुक्रवारी रात्री त्यांची अल्ट्रा बस (एम एच १२ / के क्यू ७२३६) घेऊन हिंजवडीकडून हडपसरकडे जात होते. ते हिंजवडीमधील रेडिसन हॉटेल चौकात आले असता आरोपी शरद याने त्यांची बस अडवली. आरोपी शरद फिर्यादी विठ्ठल यांच्या अंगावर धावून आला. आरोपी शरद याने बसची समोरील शोकाच व दोन्ही बाजूच्या खिडक्यांच्या काचा फोडून बसचे नुकसान केले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.