पिंपरी डेपोत पीएमपीच्या मिडीबसच्या इंजिनाचा स्फोट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2019 15:50 IST2019-12-11T15:48:46+5:302019-12-11T15:50:25+5:30
बस दुरुस्तीचे काम करत असताना अचानक रेस वाढल्याने इंजिनाचा स्फोट झाला...

पिंपरी डेपोत पीएमपीच्या मिडीबसच्या इंजिनाचा स्फोट
पिंपरी : पिंपरी डेपो येथे नवीन टाटा कंपनीच्या मिडी बसचे काम करत असताना अचानक रेस वाढून इंजिनाचा स्फोट झाला.ही घटना मंगळवारी ( दि. १० ) घडली. या अपघातात सीएनजी डेपोत काम करणारे दोन कर्मचारी गंभीर जखमी झाले. हिरामण आल्हाट,मोहन वळसे, लक्ष्मण ढेंगळे असे जखमी कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरीतील पीएमपीच्या बसडेपोमध्ये बस दुरुस्तीचे काम करत असताना अचानक रेस वाढल्याने इंजिनाचा स्फोट झाला.त्यातील जखमी कर्मचाऱ्यांवर रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्यांनी घरी सोडण्यात आले. मात्र, अशाप्रकारे स्फोट होण्याची ही गेल्या काही महिन्यातील तिसरी घटना आहे. अशाच प्रकारचा घटना भोसरी , नतावाडीनंतर आज पिंपरी डेपोत झाली आहे.
नवीन खरेदी केलेल्या गाड्या अत्यंत निकृष्ट प्रकारच्या असून सहा महिन्यांच्या आतच त्यांनी दुरुस्तीसंदर्भात खूपच कामे काढली आहे. तसेच गाड्यांची खरेदी करण्याअगोदर अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारची तपासणी केलेली नाही. त्यामुळे या अपघातांना केवळ अधिकारीच जबाबदार असल्याचा आरोप काही कर्मचाऱ्यांनी केला आहे.