देहूत आरोग्य विभाग सज्ज

By Admin | Updated: June 25, 2016 00:25 IST2016-06-25T00:25:47+5:302016-06-25T00:25:47+5:30

निर्मल वारी पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी श्रीक्षेत्र देहूगावला तात्पुरत्या स्वरूपातील (प्रीफॅब्रिकेटेड) शौचालये उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे.

Equipped with Dehuti Health Department | देहूत आरोग्य विभाग सज्ज

देहूत आरोग्य विभाग सज्ज

देहूगाव : निर्मल वारी पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी श्रीक्षेत्र देहूगावला तात्पुरत्या स्वरूपातील (प्रीफॅब्रिकेटेड) शौचालये उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे.
शासनाचा आरोग्य विभाग वारकऱ्यांच्या सेवेसाठी सज्ज झाला आहे. हे काम पालखी प्रस्थानापूर्वी पूर्ण होईल. निर्मल वारी ही संकल्पना पूर्णत्वास नेण्यासाठी श्री संत तुकाराममहाराज पालखी सोहळ्यासाठी ३०० व श्री संत ज्ञानेश्वरमहाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी ५०० शौचालये उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्यासाठी शासनाने दोन कोटी चार लाख रुपये अनुदान प्राप्त झाले आहे. काही वारकरी, भाविक उघड्यावर शौचास जाण्याची शक्यता गृहीत धरून त्या परिसरात अथवा त्या ठिकाणी तातडीने बायोकेमिकल फवारण्यात येऊन त्या परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे.
देहूगाव प्राथमिक आरोग्य केंद्रासह जिल्हा परिषद व पंचायत समितीचे २९ कर्मचारी प्रतिनियुक्तीवर आले आहेत. ते भाविकांच्या सेवेस सज्ज झाले आहेत. त्यांनी आपली सेवा देण्यास सुरुवात केली आहे. चार वैद्यकीय अधिकारी आहेत. पालखी सोहळ्यासाठी मुख्य मंदिर, वैंकुठगमन मंदिर व गाथा मंदिर येथे बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात आले आहेत. बाह्य रुग्ण व आंतररुग्ण विभाग २४ तास सुरू ठेवण्यात येणार आहे. आरोग्य केंद्राची एक, बीव्हीजीच्या तीन रुग्णवाहिका उपलब्ध केल्या आहेत. गावात धूरफवारणी सुरू करण्यात आली आहे. रुग्णालयात हिवतापाचे संशयित रुग्णांच्या रक्ताची तपासणी करत असल्याची माहिती डॉ. अनिल बिऱ्हाडे यांनी दिली.(वार्ताहर)

Web Title: Equipped with Dehuti Health Department