दारू पिल्याचा जाब विचारल्याने इंजिनिअर पतीची पत्नीला बेदम मारहाण; पत्नीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2022 14:33 IST2022-06-11T14:30:18+5:302022-06-11T14:33:56+5:30

रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना..

Engineers wife beaten to death for drinking alcohol Death of wife pune crime news | दारू पिल्याचा जाब विचारल्याने इंजिनिअर पतीची पत्नीला बेदम मारहाण; पत्नीचा मृत्यू

दारू पिल्याचा जाब विचारल्याने इंजिनिअर पतीची पत्नीला बेदम मारहाण; पत्नीचा मृत्यू

पिंपरी : दारू पिऊन घरी आलेल्या इंजिनीयर पतीला इंजिनीयर पत्नीने जाब विचारला. त्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. यात पतीने पत्नीला बेदम मारहाण केली. त्या मारहाणीत पत्नीचा मृत्यू झाला आहे. खूनप्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी पतीला अटक केली. माणगाव, हिंजवडी येथे गुरुवारी (दि. ९) रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली.

अवंतिका शर्मा (वय ३०) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. अवंतिका शर्मा यांचे वडील रंजनकुमार लाडलीमोहन शर्मा (वय ६२, रा. अलीगढ, उत्तर प्रदेश) यांनी याप्रकरणी शुक्रवारी (दि. १०) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. शिवम पंकज पचौरी उर्फ भारद्वाज (वय ३२, रा. माणगाव, हिंजवडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत अवंतिका ही शिवम याची पत्नी होती. अवंतिका आणि शिवम हे दोघेही इंजिनीयर म्हणून आयटी कंपनीत नोकरीला होते. शिवम हा गुरुवारी (दि. ९) दारू पिऊन घरी आला. त्यामुळे त्याची पत्नी अवंतिका हिने त्याला जाब विचारला. त्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. यात शिवम याने पत्नी अवंतिका यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यात अवंतिका यांचा मृत्यू झाला. 

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मयत अवंतिका यांच्या वडिलांनी फिर्याद दिल्यानंतर याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक महेंद्र गाढवे तपास करीत आहेत.

Web Title: Engineers wife beaten to death for drinking alcohol Death of wife pune crime news