कामशेत येथे अपघातात वृद्ध महिला गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 20:18 IST2018-08-07T20:17:15+5:302018-08-07T20:18:11+5:30
पुण्यावरून मुंबईकडे चाललेला कंटेनर (एमएच.४३ बीजी ९५३९ ) हरणाबाई मारुती शिंदे (वय ६८, रा. कामशेत) यांना धडक बसली.

कामशेत येथे अपघातात वृद्ध महिला गंभीर जखमी
कामशेत : कामशेत गावच्या हद्दीतील जुना मुंबई पुणे महामार्गावरील पवना फाट्यावर मंगळवारी (दि. ७) सकाळी साडेदहा वाजल्याच्या सुमारास कंटेनरने एक वृद्ध महिलेला धडक दिल्याने अपघात झाला आहे. या अपघातात महिला गंभीर जखमी झाली आहे.पुण्यावरून मुंबईकडे चाललेला कंटेनर (एमएच.४३ बीजी ९५३९ ) हरणाबाई मारुती शिंदे (वय ६८, रा. कामशेत) यांना धडक बसली व त्या कंटेनरच्या उजव्या टायरखाली आल्या. त्यांच्या दोन्ही पायांवरून कंटेनरचे चाक गेल्याने त्या गंभीर जखमी झाल्या आहे. त्यांच्यावर सोमाटणे येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. या अपघातातील कंटेनर चालक नरेंद्र प्रसाद दिवेदी याला कामशेत पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.