Pimpri Chinchwad: लिव्ह इन पार्टनरसाठी अल्पवयीनकडून वृद्धेचा खून; आरोपी सराईत गुन्हेगार
By रोशन मोरे | Updated: August 8, 2023 20:25 IST2023-08-08T20:24:45+5:302023-08-08T20:25:01+5:30
आरोपी सराईत असून त्याच्या तब्बल ११ गुन्हे दाखल आहेत...

Pimpri Chinchwad: लिव्ह इन पार्टनरसाठी अल्पवयीनकडून वृद्धेचा खून; आरोपी सराईत गुन्हेगार
पिंपरी : लिव्ह इन पार्टनर जेलमध्ये आहे. तिला जामीन मिळवून देण्यासाठी पैशाची आवश्यकता असल्याने वृद्ध महिलाचा खून करून तिचे दागिने चोरून नेले. हत्या झालेल्या वृद्धेचे महिलेचे नाव शालूबाई रूपा साळवी (वय ८५, रा. सेनेट्री चाळ, भाजी मंडईजवळ, पिंपरी) असे आहे. धक्कादायक म्हणजे खून करणारा आरोपी हा अल्पवयीन असून मंगळवारी (दि.८) तो १८ वर्षाचा होणार आहे. आरोपी सराईत असून त्याच्या तब्बल ११ गुन्हे दाखल आहेत.
ही घटना ३० जुलै ते ३१ जुलै दरम्यान सेनेट्री चाळ, भाजी मंडळीजवळ, पिंपरी येथे घडली. या प्रकरणी वृद्धेची नात सुनिता भिमराव कांबळे (वय ४८ रा. पिंपळे गुरव) यांनी शनिवारी (दि.५) पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शालूबाई साळवी या एकट्याच राहत होत्या. त्याचा फायदा घेऊन त्याच परिसरात राहणाऱ्या आरोपीने घराचे सिमेंटचा पत्रा उचकटून घरात प्रवेश केला. शालूबाई यांना कोणत्यातरी कठीण वस्तूने डोक्यात मारून जीवे खून केला. त्यानंतर त्यांच्या अंगावरील व घरात असलेल्या कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने, मोबाइल हँडसेट आणि गॅस सिलेंडर एक लाख चार हजार ५०० रुपयांचा माल चोरून नेला.
असे पकडले आरोपीला-
आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांची दोन पथके तयार करण्यात आली होती. पोलिसांनी चौकशी केली असता मृत वृद्धेच्या परिसरात राहणारा आणि गुन्हेगारी पार्श्वभुमी असेलल्या एक अल्पवयीन खूनच्या घटनेनंतर त्या भागात दिसला नसल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याला सापळा रचून आरोपीला सोमवारी (दि.७) अटक केली असता. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबूली दिली.
तब्बल ११ गुन्हे दाखल-
अल्पवयीन अल्पवयीन असला तरी तो नऊ ऑगस्टला १८ वर्ष पूर्ण करणार आहे. आरोपी हा सराईत गुन्हेगार असून पिंपरी, येरवडा, शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तब्बल ११ गुन्हे दाखल आहेत.