आठ वर्षांच्या चिमुरड्याने घेतला गळफास, थेरगाव येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2022 03:28 IST2022-06-01T03:26:37+5:302022-06-01T03:28:41+5:30

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कमल आणि त्याचा लहान भाऊ आणि बहीण घरात खेळत होते. त्यावेळी कमल याने खिडकीला बांधलेल्या दोरीने गळफास घेतला.

Eight year old boy suicide in pimpri | आठ वर्षांच्या चिमुरड्याने घेतला गळफास, थेरगाव येथील घटना

आठ वर्षांच्या चिमुरड्याने घेतला गळफास, थेरगाव येथील घटना

पिंपरी - आठ वर्षांच्या चिमुरड्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. थेरगाव येथे रविवारी (दि. २९) दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली. कमल खेम साऊद (वय ८, रा. १६ नंबर बस स्टॉप, थेरगाव) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कमल आणि त्याचा लहान भाऊ आणि बहीण घरात खेळत होते. त्यावेळी कमल याने खिडकीला बांधलेल्या दोरीने गळफास घेतला. काही वेळानंतर कमलच्या आईने खोलीत येऊन पाहिले असता हा प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच वाकड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

Web Title: Eight year old boy suicide in pimpri