पिंपरी : ट्रक आणि टेम्पोची धडक होऊन झालेल्या अपघातात टेम्पोतील आठ महिन्यांच्या बालकाचा मृत्यु झाला. तर, पाच जण जखमी झाले. ही घटना चाकण - तळेगाव रस्त्यावर महाळूंगे येथे घडली. स्वराज प्रदीप गाडे असे मृत्युमुखी पडलेल्या आठ महिन्याच्या मुलाचे नाव आहे. तर, स्वराजची आई माधुरी प्रदीप गाडे, राजू पाटोळे, सुभद्रा गाडे, जयश्री गाडे आणि अनुष्का निवृत्ती बोरकर (वय १३) अशी जखमींची नावे आहेत. ट्रकचालक पांडुरंग बाबा गावडे (रा. पुणे) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ५ मे रोजी टेम्पो चाकणहून तळेगाव - दाभाडेच्या दिशेने चालला होता. महाळूंगे येथे शहिद विजय खांडेकर पेट्रोल पंपासमोर आरोपी गावडे हा अचानक ट्रक पेट्रोल पंपाबाहेर वळवित होता. याचवेळी आलेल्या टेम्पोची ट्रकला धडक बसली. यात टेम्पोतील आठ महिन्याच्या स्वराजचा मृत्यु झाला. तर, पाच जण जखमी झाले.
महाळुंगे येथे ट्रक - टेम्पो अपघातात आठ महिन्यांच्या बालकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2019 19:20 IST