शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

'शिक्षण एवढे मग हे काम कसे करू...' पोस्टमनचे काम करणाऱ्या उच्चशिक्षित तरुणांची मानसिकता

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2022 10:00 IST

पोस्टमन पदासाठी उच्चशिक्षित मुले करताहेत अर्ज

पिंपरी : पोस्टमन पदासाठी शैक्षणिक पात्रता अवघी दहावी, बारावी पास आहे. मात्र, बेरोजगारीच्या काळात सरकारी नोकरी म्हणून बीएस्सी, बीटेक, इंजिनिअर झालेले तरुण-तरुणी या पदासाठी अर्ज करतात. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून त्यांची निवड होते. परीक्षा देताना आपण कोणत्या पदासाठी निवडले गेले आहोत, याची माहिती त्यांना असते. मात्र, काम करताना आपले शिक्षण एवढे झाले आहे त्यामुळे हे काम कसे करू, अशी मानसिकता निर्माण झाल्याने हे काम सोडले जात असल्याचे निदर्शनास येत आहे.

पिंपरी पोस्टात काम करणाऱ्या इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेल्या दोन पोस्टमन तरुणींनी कामाच्या अवघ्या दीड महिन्यांत राजीनामा दिला.पोस्टमन पदासाठी झालेल्या परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळवून एमपीएससी तसेच यूपीएससीचा अभ्यास करणारे तरुण, तरुणी यश मिळवितात. मात्र, अपेक्षेप्रमाणे पोस्ट न मिळाल्याने किंवा काम करताना यापेक्षा मोठी संधी आपल्याला मिळेल. म्हणून निवड झालेले तरुण-तरुणी दुसरी संधी शोधत असल्याचे सांगितले जात आहे.

कर्मचाऱ्यांची कमतरता नाही

पोस्टाकडून दरवर्षी नोकरीभरती केली जाते. त्यामुळे काहीजण जरी नोकरी सोडून जात असले तरी नव्याने दुसरे कर्मचारी रुजू होत असतात त्यामुळे काम करताना कर्मचाऱ्यांचा तुटवडा नसतो, असे पिंपरी पोस्ट कार्यालयाचे जनसंपर्क डाक निरीक्षक नितीन बने यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेPost Officeपोस्ट ऑफिसEmployeeकर्मचारीStudentविद्यार्थी