शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीवरून ट्रिप्सी जाणाऱ्यांना डंपरची धडक; एकाचा मृत्यू तर दोघे जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2021 14:26 IST

चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल, मावळ तालुक्यातील नानोली फाटा येथे गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास हा अपघात झाला.

ठळक मुद्देअपघाताची माहिती न देता डंपर चालक फरार

पिंपरी : दुचाकीवरून ट्रिप्सी जाणाऱ्यांना डंपरची जोरदार धडक बसल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. तर इतर दोघे जखमी झाले आहेत. मावळ तालुक्यातील नानोली फाटा येथे गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास हा अपघात झाला.

आकाश नारायण राठोड (वय २१, रा. नवलाख उंबरे, ता. मावळ, मूळ रा. वाशिम), असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. शुभम खेडकर (रा. वाशिम) आणि शिवबहादुर माताफेरमोरय (वय २८, रा. नवलाख उंबरे, मूळ रा. उत्तरप्रदेश), अशी जखमींची नावे आहेत. तर शिवबहादुर यांनी याबाबत तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार डंपर चालकाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवबहादूर, त्यांचा मित्र आकाश आणि शुभम असे तिघेजण एका दुचाकीवरून नवलाख उंबरे ते आंबी रोडने जात होते. ते नानोली फाटा येथे आले असता भरधाव डंपरने अचानक वळण घेत असताना शिवबहादूर यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. यामध्ये फिर्यादी यांचा मित्र आकाश राठोड हा गंभीर जखमी झाला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. तर दुसरा मित्र शुभम खेडकर आणि शिवबहादूर जखमी झाले. त्यांच्या दुचाकीचे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती न देता अज्ञात डंपर चालक निघून गेला.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसAccidentअपघातDeathमृत्यू